शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

सावंगीत संपूर्ण दारूबंदीचा ठराव

By admin | Published: October 30, 2015 12:32 AM

येथे अवैध दारुविक्रीला उधाण येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे.

नागरिक सरसावले : समितीचा पुढाकार सावंगी (जिचकार) : येथे अवैध दारुविक्रीला उधाण येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. शाळकरी मुलेसुध्दा दारुच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. अनेकवेळा या गावातील महिला बचत गट, ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त गाव समितीने याबबात पाठपुरावा करुनही दारुबंदी होत नाही. याला पोलिसांचे अभय असल्याची चर्चा आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पहिली सभा घेऊन गावात दारुबंदीचा शेकडो ग्रामस्थांसमक्ष ठराव घेतला असून वरुड ठाण्यात निवेदन देण्यात आले.अवैध दारुविक्रेत्यांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचे सांगण्यात येत असल्याने महिला बचत गट तसेच सर्वसामान्य नागरिकांनी दारू विक्रीला मज्जाव केला. खोट्या तक्रारी देणे, विरोध करणाऱ्या नागरिकांच्या घरावर हल्ले करण्याचा प्रकार घडतो. काही दिवसांपूर्वी महिलांनी पुढे येऊन दारुविक्रीला बंदी घालण्याचा प्रयत्न केला असता मारझोडीचे प्रकार घडले होते. उलट महिलांविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग पावण्याचे प्रकार घडतात. तर वारंवार याबाबत तक्रारी करूनही काहीकाळ शांतता प्रस्थापित होते आणि नंतर पुन्हा 'जैसे थेच' अवैध दारूविक्रीला उधाण येते. याकरिता ग्रामपंचायत, महिला बचत गट, तंटामुक्ती गाव समितीने अनेकवेळा तक्रारी केल्यात. मात्र यावर अंकुश लावण्यात पोलीस हतबल झाले आहे. नवनियुक्त तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नंदलाल निंभोरकर यांनी सभा बोलावून सावंगीतील दारूबंदीचा ठराव घेतला असून पोलिसांना ठरावाची प्रत देण्यात आली आहे. परंतु पोलीस ही बाब किती गंभीरतेने घेणार याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले असून पोलिसांना याबाबत माहिती दिली असता विक्री करणारे एक दोन बॉटल विकत असल्याने सर्रास विक्री करताना दिसून येत नाही. विक्रेत्याकडे पेट्या आढळल्यास कारवाई करणे सुकर होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु उपसपंच, महिला बचत गट आणि तंटामुक्त गाव समिती तसेच शेकडो महिलांच्या सहिनिशी पोलिसांना निवेदन दिले असून आठ दिवसांत दारू बंदी झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)