लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : मुंबई येथून ओडिसाकडे नागपूर दिशेने नवे कोरे विना क्रमांकाचे चार चाकी वाहन घेऊन जात असलेल्या एका चालकाचे हातपाय बांधून चारचाकी वाहन पळवल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी वरखेड फाट्यावर घडली होती. त्याप्रकरणातील मुख्य आरोपीला १३ महिन्यांनंतर तिवसा पोलिसांनी सोमवारी बुलडाणा येथून अटक केली.सैयद शकील सैयद युसूफ (३८, रा.जोहरनगर, बुलडाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचेविरुद्ध मुबंई, अकोला, बुलडाणा या ठिकाणी महागड्या वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.वाहनचालक सुभाष सोनार (४५, रा.जळगाव) हे नवे वाहन घेऊन तिवसा मार्गे जात होते. त्यांच्या वाहनात चार अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसले होते. त्या चौघांनी तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरखेड फाट्याजवळ लघु शंकेच्या बहाण्याने वाहन थांबवले. चालक सोनार यांचे हातपाय बांधून ते वाहन अकोला जिल्ह्यातील बोरगाव येथील एका शेतात नेले व चालकाला मारहाण करीत त्याच अवस्थेत शेतात सोडून दिले. त्या चार अज्ञात इसमांनी सदर वाहन पळविल्याची तक्रार चालक सुभाष सोनार यांनी ११ फेब्रुवारी २०१८ रोजी तिवसा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. यातील तीन आरोपींना चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी पसार होता. त्यास बुलडाण्यातून अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक सोनारेकर, अरुण श्रीनाथ, दीपक राऊत, मिनेश खांडेकर, होमगार्ड नंदकिशोर सोनटक्के यांनी ही कारवाई केली.
१३ महिन्यांनंतर आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:06 PM
मुंबई येथून ओडिसाकडे नागपूर दिशेने नवे कोरे विना क्रमांकाचे चार चाकी वाहन घेऊन जात असलेल्या एका चालकाचे हातपाय बांधून चारचाकी वाहन पळवल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी वरखेड फाट्यावर घडली होती. त्याप्रकरणातील मुख्य आरोपीला १३ महिन्यांनंतर तिवसा पोलिसांनी सोमवारी बुलडाणा येथून अटक केली.
ठळक मुद्देचालकाचे अपहरण : चारचाकी पळविल्याचे प्रकरण