लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर यंदा रावण दहन केले जाईल. उद्या शनिवारी विजयादशमीच्या पर्वावर नेहरू मैदानात दशमुखी रावणाच्या पुतळ्याचे दहन होईल. दीर्घ कालावधीनंतर होणाºया या रावण दहनाची अमरावतीकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याकार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून रावण दहनाला अमरावतीकरांचा व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे आदिवासी समाज संघटनांनी रावण दहनाला विरोध केल्याने याकार्यक्रमावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.खंडित झालेली रावण दहनाची परंपरा दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी विश्व हिन्दू महासंघाने पुढाकार घेतला आहे. ‘असत्यावर सत्याच्या विजया’चे प्रतिक म्हणून विजयादशमी उत्सव देशभरात साजरा केला जातो. अंहकाररूपी रावण दहन करण्याची प्रथा देखील पूर्वापार चालत आली आहे. मात्र, रावण दहनाची ही परंपरा २२ वर्षांपासून खंडित झाली होती. विश्व हिंदू महासभेच्या पुढाकाराने ही परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सायंकाळी ५.३० वाजता रावण दहन कार्यक्रमाचे उद्घाटन होईल व सायंकाळी ६ वाजता रावण दहन केले जाईल.परवानगी न देण्याची मागणीरावण दहन कार्यक्रमामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी महिला संघाच्या महानंदा टेकाम यांच्यासह काही महिलांनी रावण दहनास परवानगी देऊ नये, अशी मागणी कोतवाली पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदिवासी महिला संघाला चर्चेकरिता बोलाविले होते.पार्किंग व्यवस्थारावण दहन कार्यक्रमासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता े शहर कोतवालीस्थित सिटी क्लबजवळ व रायली प्लॉटलगत चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
२२ वर्षानंतर अमरावतीत रावण दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 9:35 PM
शहरात तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर यंदा रावण दहन केले जाईल. उद्या शनिवारी विजयादशमीच्या पर्वावर नेहरू मैदानात दशमुखी रावणाच्या पुतळ्याचे दहन होईल.
ठळक मुद्देउत्कंठा शिगेला : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त