लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कठुआ येथील बलात्कार व हत्याप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्चनंतर पेट्रोल पंपाचे कार्यालय व एका व्यापारी प्रतिष्ठानाची तोडफोड केली. त्यामुळे रविवारी रात्री कोतवाली हद्दीत तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी सोमवारी चार नगरसेवकांसह २२ जणांना अटक केली.पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी रविवारी रात्री राजकमल चौकात एमआयएमकडून कॅन्डलमार्च काढण्यात आला. शेकडो नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन घटनेचा निषेध नोंदविला. मात्र, रात्रीच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी मालविय चौकातील पेट्रोलपंप कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या. सोबतच एका व्यापारी प्रतिष्ठानावर दगडफेक केली. कार्यकर्त्यांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण केला आणि घोषणाबाजी केल्याने तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावून तणावाची स्थिती नियंत्रणात आणली.बारांविरुद्ध रहदारीस अडथळ्याचा गुन्हागैरकायदेशीर मंडळी जमवून रहदारीस अडथळा करणाऱ्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यात एमआयएमचे अ. नाजीम अ.रऊफ, अफजल हुसैन मुबारक हुसैन, मो. साबीर व इम्रान अब्दुल सईद या चार नगरसेवकांसह मो. इम्रान मो. याकुब, विनोद गाडे, विवेक राऊत, शेख रहेमान शेख इनायत, अब्दुल खान वहीद खान, सल्लाउद्दीन खान , समिर शहा कय्युम शहा, मो. अकील मो. हनीफ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.त्यांना ठाण्यातून जामीन देण्यात आला.तोडफोड करणाऱ्यांनाही जामीनपेट्रोल पंप ,खादिम शोरूमची तोडफोड केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली. त्यामध्ये सै.युनूस सै.हसन, अ. आरिफ अ. शफीक, रियाज खान हयात खान, अफरोज खान रशिद खान, शेख हसन शेख यासीन, सादिक शहा करिम शहा, शेख जावीद शेख बशीर, रासद खान , शेख नईम शेख ताज उर्फ नईम ईल्ली व फयाज खाँ यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.पेट्रोलने भरलेले टँकर जाळण्याची धमकीकॅन्डलमार्च काढणाऱ्या काही तरुणांनी मालवीय चौकातील पेट्रोल पंप कार्यालयावर दगडफेक करून नारेबाजी केली. दरम्यान त्या ठिकाणी पेट्रोल असलेला टँकर जाळण्याची धमकीसुध्दा दिली. पेट्रोल पंप जला दो, मार दो, देखेंगे बाद मे, असे भाष्य करून त्या तरुणांनी चिथावणी दिली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळून आंदोलनकर्त्यांना दुर सारले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आंदोलनकर्त्यांनी टँकर जाळला असता, तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. याघटनेची तक्रार मोहन जाजोदीया यांनी कोतवाली पोलिसांकडे नोंदविली आहे.
कॅन्डलमार्चनंतर तोडफोड, चार नगरसेवकांसह २२ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:29 PM
कठुआ येथील बलात्कार व हत्याप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्चनंतर पेट्रोल पंपाचे कार्यालय व एका व्यापारी प्रतिष्ठानाची तोडफोड केली. त्यामुळे रविवारी रात्री कोतवाली हद्दीत तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी सोमवारी चार नगरसेवकांसह २२ जणांना अटक केली.
ठळक मुद्देशहरात तणावसदृश स्थिती : कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल