लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २० डिसेंबर रोजी होत आहे. मात्र, यंदा या समारंभातून पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करण्यात आली असून, अतिथी, पाहुण्यांना गाऊन, टोपीऐवजी स्कॉर्फ असणार आहेत. गाऊनऐवजी पांढरी जोधपुरी, काळे बूट परिधान करण्याची परवानगी बहाल केली आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर आणि राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे दिनेश सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने पदवी समारंभातून पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात दिसून येणार आहे. दीक्षांत समारंभात आता विशेष अतिथी, पाहुणे, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता आदींना विविध रंगी गाऊन, टोपी असणार नाही. त्याऐवजी अतिथी नव्या गणवेशात दिसणार आहे. मंचावरील पुरूष मंडळी पांढरी जोधपुरी आणि काळे बूट, तर महिला मंडळी पांढरी साडी परिधान करतील. अनेक वर्षांनंतर हा बदल झाल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष राहणार आहे.विद्यापीठाने दीक्षांत समारंभात परिधान करावयाचे पोशाख आणि स्कार्फसंबंधी नुकताच एक निर्देश जारी केला आहे. यामध्ये मंचावर आसनस्थ प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रंगाचा स्कार्फ निश्चित करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाची पदवी प्राप्त करणाºया पदवीकांक्षींसाठीदेखील स्कार्फचा रंग आणि पोशाख निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पुरूषांना पांढरे शर्ट किंवा पांढरी जोधपुरी, तर महिलांना पांढरी साडी असा पोशाख विद्यापीठाने निश्चित केला आहे. त्यामुळे यंदाच्या दीक्षांत समारंभात सर्वांचाच लूक नवा दिसणार आहे. या निर्णयामागे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख यांचीही भूमिका महत्त्वाची होती.चार विद्याशाखांसाठी चार रंगाचे स्कॉर्फदरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या विद्याशाखांच्या पदवीकांक्षींसाठी स्कार्फचा रंग निश्चित करण्यात आले आहे. तोच रंग त्या विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांना देखील परिधान करावा लागेल. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी बॉटल ग्रीन, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी पेल ब्लू, मानव्यविज्ञान विद्याशाखेसाठी नेवी ब्लू, आंतरविद्याशाखीय अभ्यासविद्याशाखेसाठी रोज या चार रंगाचे स्कार्फ निश्चित करण्यात आले आहेत.
अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातून गाऊन, टोपी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:16 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २० डिसेंबर रोजी होत आहे. मात्र, यंदा या समारंभातून पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करण्यात आली असून, अतिथी, पाहुण्यांना गाऊन, टोपीऐवजी स्कॉर्फ असणार आहेत.
ठळक मुद्देभारतीय संस्कृतीचे दर्शन अतिथी, पाहुण्यांना असणार विविध रंगी स्कॉर्फ