अमरावती : कोरोनामुळे प्रवाशी संख्या घटल्याने यापूर्वी रेल्वे बोर्डाने बहुतांश गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालच्या उपसागरातून ‘यास’ वादळाचे संकट उभे ठाकल्याने हावडा येथून धावणाऱ्या बहुतांश रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
पुरी-एलटीटी (०२१४६), सुरत-पुरी (०२८२८), पुरी-अहमदाबाद (०२८४३), ॲडिशनल पुरी (०२८४४), एलटीटी- हावडा (०२१०१), हावडा-एलटीटी (०२१०२), हावडा-पोरबंदर (०२२२१), पोरबंदर-हावडा (०२२२२), सुरत- पोरबंदर(०२८१७), पोरबंदर-सुरत (०२८१८), पुरी ॲडशिनल (०२०३७), पुरी- जेयू (०२०९४) या रेल्वे गाड्या २९ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती रेल्वे स्थानकाहून अमरावती-मुंबई, अमरावती-सुरत, अमरावती-पुणे, अमरावती-जबलपूर या गाड्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अजनी-पुणे, हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस, गोंदिया-कोल्हापूर, हावडा-पुणे आझाद हिंद, हावडा-कुर्ला सुपर डिलक्स, पुरी-ओखा, हावडा-पुरी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘यास’ हे वादळ अतिशय धोकादायक ठरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे हावडा आणि पुरी येथून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्या तूर्त बंद करण्यात आल्या आहेत. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याने रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
--------------------
आरक्षण खिडक्यांवर ‘रिफंड’साठी गर्दी
भुसावळ-नागपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी तिकीट रिफंड मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर धाव घेतली आहे. अमरावती रेल्वे स्थानकावरून दरदिवशी लाख ते सवालाख रुपये रिफंड दिला जात असल्याची माहिती आहे.