आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदादेखील अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, या काळातही दिवसाला एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. यंदा वर्षभरात २६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाचे प्रयत्न थिटे पडल्याचे वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यांसह अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुलामुलींचे विवाह, शिक्षणाची चिंता व जगावे कसे, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढतच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१७ पावेतो ३ हजार ३१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ३४९ प्रकरणे पात्र, १ हजार ९१४ अपात्र, तर ५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्ह्यात यंदा २६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी २४, मार्च ३०, एप्रिल १४, मे १७, जून २१, जुलै २५, आॅगस्ट २७, सप्टेंबर ३२, आॅक्टोबर २३, नोव्हेंबर १३ व २७ डिसेंबरपर्र्यंत २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.२००१ पासून ३,३१७ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ३१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. २००१ मध्ये ११ प्रकरणे होती. २०१६ मध्ये ३४९, तर यंदा २६५ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.खरिपाच्या पेरणीपश्चात आत्महत्यांमध्ये वाढगेल्या १७ वर्षांचा आढावा घेता, सर्वाधिक ३२३ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात २४४, फेब्रुवारी २७०, मार्च २७९, एप्रिल २३५, मे २८६, जून २५७, जुलै २६२, सप्टेंबर ३१५, आॅक्टोबर २८४, नोव्हेंबर २७९ व डिसेंबर महिन्यात २७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासन नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीपश्चात दरवर्षी शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढत असल्याचे वास्तव आहे.
कर्जमाफीनंतरही थांबेना शेतकरी आत्महत्यांचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:55 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदादेखील अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, या काळातही दिवसाला एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. यंदा वर्षभरात २६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाचे प्रयत्न थिटे पडल्याचे वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी ...
ठळक मुद्देधक्कादायक वास्तव : यंदा २६५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला