लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्टकार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. ४ हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात वर्षभरात ४ हजार किमीचा प्रवास करता येतो. मात्र, त्याची मोजणी होत नव्हती. आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे अर्धे तिकीट दिले जात होते. या मर्यादेपासून सवलत घेणारेही अनभिज्ञ होते. आता एसटी महामंडळ सवलत घेणाऱ्यास स्मार्ट कार्ड देण्यात आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च, अशी एक वर्ष स्मार्टकार्डची मुदत राहील. प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागेले. ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड मशीनद्वारे स्वाईप केले जातील. याद्वारे कार्डधारकांनी नेमका किती प्रवास केला याची माहिती वाहकाला मिळणार आहे. प्रवास सवलत चार हजार कि.मी.चा हिशेब प्रत्येक प्रवासात होणार आहे. चार हजार किलोमीटर संपली की वाहक पूर्ण तिकीट फाडणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता आपण किती प्रवास केला याची मोजदाद करावी लागणार आहे.स्मार्ट कार्डची नोंदणी केली जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही. त्यांच्याकडील आधार कार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकीटाने प्रवास करून दिला जाणार आहे. पुढील काळात मात्र अर्ध्या तिकिटासाठी आधार तुटणार आहे. स्मार्ट कार्ड योजना लागू झाल्याने प्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे.ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड दिले जाणार असल्याने आधार कार्ड मतदान कार्ड यातून सुटका होणार आहे. स्मार्ट कार्ड रिचार्जची सोय आहे.त्यामुळे प्रवासात सोबत पैसे बाळगण्याची गरज नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्याची ज्येष्ठांना ५५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आॅनलाईन नोंदणी नंतर कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाते. त्यानंतर १० ते १५ दिवसात संबंधिताला कार्ड दिले जाणार आहे.स्मार्टकार्डसाठी मुदतवाढअमरावती : राज्य परिवहन महामंडळामार्फत (एसटी)तर्फे देण्यात येणाºया विविध प्रवास दर सवलतीसाठी स्मार्टकार्ड असणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, बºयाच सवलती धारकांना हे स्मार्ट कार्ड मिळालेले नाहीत. सध्या शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. पण स्मार्ट कार्डअभावी विद्यार्थ्यांचे तसेच ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आदींची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे स्मार्टकार्ड घेण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.एसटी महामंडळाकडून स्मार्टकार्ड दिले जात आहे. त्यासाठी आधार कार्ड, मतदार कार्डच्या आकाराचे कार्ड दिलेजाते. ज्यांनी स्मार्टकार्ड काढले नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांनी येत्या ३१ डिसेंबरपूर्वी संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधून आपली स्मार्ट कार्ड काढून घ्यावे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रक, परिवहन
चार हजार किमीनंतर ज्येष्ठांनाही प्रवासभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:22 AM
वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्टकार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. ४ हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.
ठळक मुद्देएसटीच्या स्मार्ट कार्डमुळे : प्रवास मर्यादा संपताच मोजावे लागणार पूर्ण भाडे