ऑनलाईन लोकमत अमरावती : भातकुली तालुक्यातील वलगाव येथे उपसरपंच निवडणुकीदरम्यान बहुमतात असलेल्या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. गुप्त मतदानानंतर बहुमत मिळालेल्या सदस्याला अपात्र ठरविण्यात आले, तर कमी मते असतानाच तेच उपसरपंच असतील असा फतवा सरपंचाने काढला.गत महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वलगाव येथील सरपंचपदी मोहिनी मोहोड या थेट जनतेतून निवडून आल्या. त्यानंतर मंगळवारी (दि.२८) पहिल्या मासिक सभेत उपसरपंचाची निवड करायची होती. सरपंच मोहिनी मोहोड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या निवडप्रक्रियेत उपसरपंचपदासाठी महेश उकटे व विजय जोशी यांनी उमेदवारी दाखल केली. एकूण १७ सदस्यांनी निवडणुकीत सहभाग नोंदविला. मार्कर पेनचा वापर करीत गुप्त पद्धतीने मतदान झाले. निकालाअंती १७ पैकी १६ सदस्यांनी मार्कर पेन वापरला, तर एका सदस्याने बॉल पेन वापरला. त्यामुळे ही निवड प्रक्रिया रद्द ठरविण्यात आली. काही वेळात पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. त्यामध्ये महेश उकटे यांना नऊ व विजय जोशी यांना आठ मते मिळाली. तरीही जोशी हेच उपसरपंच असतील, असे सरपंचांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारसंवैधानिक पद्धती नाकारून महिला सरपंचाने केलेला हा प्रकार अन्यायकारक असून, याबाबत बुधवारी सकाळी वलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य महेश उकटे, प्रफुल खोडस्कर, जगदीश भटकर, गजानन मोंढे, रूपाली धारपवार, मंगला उगले, सुनीता गायकवाड, नीता विजयकर, रुबिना बानो सिकंदर शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
बहुमत असताना उपसरपंचाची निवड ठरविली बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:28 PM
ऑनलाईन लोकमत अमरावती : भातकुली तालुक्यातील वलगाव येथे उपसरपंच निवडणुकीदरम्यान बहुमतात असलेल्या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. गुप्त मतदानानंतर बहुमत मिळालेल्या सदस्याला अपात्र ठरविण्यात आले, तर कमी मते असतानाच तेच उपसरपंच असतील असा फतवा सरपंचाने काढला.गत महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वलगाव येथील सरपंचपदी मोहिनी ...
ठळक मुद्देगुप्त मतदान : वलगाव येथील पहिल्या मासिक सभेतील प्रकार