लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मादा बिबट आणि तिच्या पिलाची भेट घडवून आणली. तत्पूर्वी, ज्याला बिबटाचे पिलू दृष्टीस पडले, त्या शेतकºयानेही जबाबदारीचे भान ठेवून १५ ते २० दिवसांच्या या पिलाला वनविभागाच्या सुपूर्द केले होते.मोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत एका शिवारातील नाल्यात शेतकºयाला १७ एप्रिल रोजी बिबट्याचे पिलू दृष्टीस पडले. त्यांनी बिबट्याच्या पिलाला मोर्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरत्ने यांच्याकडे सोपविले. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पिलाची तपासणी करून घेतली. यानंतर सतत दोन दिवस नाल्यातील सदर जागी पिलाला वनकर्मचाºयांच्या निगराणीत रात्रभर ठेवण्यात आले. बिबट न आल्याने सुरत्ने यांनी अमरावती येथील उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. वनरक्षक अमोल गावनेर यांच्या रेस्क्यू टीमने १९ एप्रिल रोजी दुपारी १२ पासून मादी बिबटाचा शोध घेतला. घटनास्थळाच्या आजूबाजूला रेस्क्यू टीमला बिबट्याचे पगमार्क, विष्ठा आढळली. सायंकाळी ६ वाजता प्रत्यक्ष बिबट दिसला. मात्र, ते नर की मादा, याची खात्री झाली नाही. आणखी जवळ जाऊन रेस्क्यू टीमने ती मादा बिबट असल्याची खात्री केली. रेस्क्यू टीमने पिलाला झुडुपांमध्ये ठेवले आणि सुरक्षित अंतरावर उभे राहून त्यांनी निरीक्षण केले. सायंकाळी ६.४५ वाजता मादी बिबटाने पिलाची पाहणी केली. मात्र, त्याला न घेताच निघून गेली. रात्री ९ वाजता परत येऊन मादा बिबट्याने पिलाला आपल्या सुळ्यांमध्ये अलगद अडकविले आणि तेथून घेऊन गेली.यांनी घेतले परिश्रमसदर कार्यवाही उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे व डॉ. स्वप्निल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरत्ने, रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक, मनोज ठाकूर, अभी व्यवहारे, इंद्रप्रताप ठाकरे यांच्या पथकाने पार पाडली.
अखेर दोन दिवसांनी बिबट्याच्या पिलाला मिळाले मातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 1:13 AM
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मादा बिबट आणि तिच्या पिलाची भेट घडवून आणली. तत्पूर्वी, ज्याला बिबटाचे पिलू दृष्टीस पडले, त्या शेतकºयानेही जबाबदारीचे भान ठेवून १५ ते २० दिवसांच्या या पिलाला वनविभागाच्या सुपूर्द केले होते.
ठळक मुद्देसंडे अँकर । वनविभागाचे परिश्रम, शेतकऱ्यानेही ठेवले जबाबदारीचे भान