नाफेडची खरेदी : सोमवारपासून सर्व केंद्रावर सुरू होणारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडद्वारे शासकीय तुरीची खरेदी ३१ मे पर्यंत करण्यात येणार आहे. दहा ही केंद्रावरील तुरीची खरेदी आता राज्य सहकारी पणन महामंडळ (डीएमओ) करणार आहे. यापैकी पाच केंद्रावर आतापर्यंत व्हीसीएमएफ द्वारा तुरीची खरेदी करण्यात येत होती. मात्र त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाद्वारा अचलपूर, अंजनगाव, चांदूरबाजार, दर्यापूर व वरूड तसेच व्हीसीएमएफ व नाफेड द्वारा चांदूररेल्वे, नांदगाव, मोर्शी, अमरावती व धामणगाव रेल्वे तसेच आदिवासी विकास महामंडळाद्वारा धारणी येथे तूर खरेदी केंद्र सुरू आहेत. २२ एप्रिल रोजी तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यानंतर केंद्रावर शिल्लक असलेली तूर राज्य शासनाद्वारा खरेदी करण्यात येत आहे. आता या केंद्रावर ३१ मे पर्यंत तुरीची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाद्वारा घेण्यात आला. त्यामुळे पहिल्याप्रमाणेच खरेदीदार यंत्रणांद्वारा या केंद्रावर मोजणी होईल अशी अपेक्षा होती. मात्र व्हीसीएमएफ ही मुळात रासायनिक खत खरेदीसी संबंधित यंत्रणा आहे. त्यांच्याजवळ तूर खरेदीसाठी तांत्रिक मनुष्यबळ, बारदाना व गोदाम आदी विषयी उणीवा आहेत. त्यामुळे ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या केंद्रावरील तूर खरेदी ही डिएमओमार्फतच करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ चांदूरबाजार केंद्रावरच डीएमओद्वारा तुरीची खरेदी होत आहे. मात्र अन्य चार केंद्रावरील तूर मोजणी शनिवारपर्यंत व सर्वच केंद्रावरील शिल्लक तुरीची खरेदी रविवारपर्यंत होण्याची शक्यता असल्याने सोमवारपासून सर्वच केंद्रावर तुरीची खरेदी सुरू होणार आहे. नाफेडद्वारा चांदूरबाजारला खरेदी सुरूकेंद्राने जाहीर केलेल्या ३१ मे पर्यंतच्या खरेदीसाठी सध्या जिल्ह्यात बुधवारपासून चांदूरबाजार केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आली. या केंद्रावर १२७ शेतकऱ्यांची २०५२.६० क्विंटल तुरीची खरेदी आतापर्यंत करण्यात आली. चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अंजनगाव सुर्जी केंद्रावर एक-दोन दिवसांत नाफेडची तूर खरेदी सुरू होणार आहे. सहा हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेतजिल्ह्यातील अन्य केंद्रांवर २२०६ शेतकऱ्यांची ६१,६०४ क्विंटल तूर खरेदी व मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यात नांदगाव केंद्रावर १८४०, मोर्शी १७७५, अमरावती ७५२५, धामणगाव १०,१८५, अंजनगाव १,२५०, दर्यापूर १५,८५८, वरूड १५,१५१ व धारणी केंद्रावर २१८४ क्विंटल तुरीचा समावेश आहे. आतापर्यंत ५.४८ लाख क्विंटल शासकीय खरेदीजिल्ह्यात आतापर्यंत २५,९३६ शेतकऱ्यांची ५,४८,३२२ क्विंटल तुरीची शासकीय खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे २४,४३६ क्विंटल, नांदगाव २०,१२२, मोर्शी ४२,०१७, अमरावती ८१,६१३, धामणगाव ४५,८०५, अचलपूर ८७,१६३, अंजनगाव ५१,३९९, चांदूरबाजार ३७,८२५, दर्यापूर १,८०,६११, वरूड ५४,७६४ व धारणी येथे २५६३ क्विंटल तुरीची शासकीय खरेदी करण्यात आली.
व्हीसीएमएफ बाद, डीएमओच खरेदी यंत्रणा
By admin | Published: May 13, 2017 12:06 AM