अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा पाच कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यूृ झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६१९ वर पोहोचली आहे. याशिवाय ४६५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४४,२२२ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना तीन दिवसांत उच्चांकी कोरोना चाचण्या होत आहेत. गुरुवारीदेखील ३,९७० चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ११.७१ अशी पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आली आहे. या आठवड्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेनदिवस कमी होत आहे. हा जिल्ह्यासाठी दिलासा आहे. कोरोना संसर्ग कमी व्हावा, यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे सातत्याने प्रयत्न करण्यात आले. ‘होम आयसोलेशन’ रुग्णांवर करडी नजर ठेवण्यात आली व जे रुग्ण घरी आढळले नाहीत, त्यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्यामुळे इतरांवर वचक बसला आहे.
कोरोनामुक्त झालेल्या ४५७ रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनामुक्त नागरिकांची संख्या ३९,२९३ वर पोहोचली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ८८,८५ टक्क्यांवर पोहोचले. मृत्युदराचे प्रमाण १.४० झाल्याचा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा अहवाल आहे.
बॉक्स
गुरुवारी सहा मृत्यू
००००००००
०००००००००००