लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ टोलनाक्यावर टोलमुक्तीसाठी रास्तारोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरीने पोलीस व्हॅनमध्ये टाकले. पोलिसांनी २५ ते ३० कार्यकर्त्यांना 'डिटेन' करून पोलीस विभागाच्या वसंत हॉलमध्ये नेले होते.अमरावतीवरून मोर्शीकडे जाणाºया वाहनांना केवळ पाच किलोमीटर अंतरासाठी टोल आकारण्यात येत असल्याच्या विरोधात मोर्शी-वरूड टोलमुक्ती समितीने आंदोलन छेडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टोलमुक्तीसाठी समिती प्रयत्नरत असून, शासन व लोकप्रतिनिधी स्तरावर समितीने निवेदन देऊन टोलमुक्तीसाठी अथक परिश्रम घेतले. दरम्यान, टोलमुक्ती आंदोलनात विदर्भ आॅटोचालक फेडरेशनचे संस्थापक नितीन मोहोड व अमरावती ट्रान्सपोर्ट एजन्ट असोशिएशनेही उडी घेतली. यासोबत काही राजकीय पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी टोलमुक्तीसाठी आरपार लढा देऊ, अशी घोषणा टोलमुक्तीसह अन्य संघटनांनी दिली. त्यानुसार सोमवारी सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी नांदगाव पेठ टोलनाक्यावर एकत्रित आले. हातात शासना विरोधातील फलके घेऊन आंदोलनकर्त्याने तीव्र घोषणाबाजी सुरु करून टोलनाक्यावरील वाहने अडविले. साखळी श्रुंखला करून रास्ता रोको करून रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे काही वेळापर्यंत टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेराव घालून आंदोलनासाठी मज्जाव केला. मात्र, आंदोलनकर्ते आक्रमक होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये जबरीने टाकले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला. मात्र, पोलीसी खाक्यासमोर आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यात आला. या आंदोलनात मोर्शी वरूड येथील विशाल तिजारे, भैय्या साबळे, निलेश गनथडे, बाळासाहेब बोहरपी, जितू बुरंगे, रवि यावलकर, आपा गेडाम, अजीज पठाण, नितीन उमाळे, नाना देशमुख, मनीष चौधरी, संजय पांडव, विक्रम ठाकरे, विजय श्रीराव, धनंजय बोकडे, दिलीप कोहळे, नितीन पन्नासे, नईम खान, नितीन मोहोड, सागर ठाकरे, आशीष टाकोडे आदी उपस्थित होते.नितीन मोहोड, प्रदीप बाजडसह शेकडो कार्यकर्ते 'डिटेन'आंदोलनकर्त्यांमधील नितीन मोहोड, प्रदीप बाजड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात नारेबाजी केली. गडकरी झोपले आहे का, आमदार खासदारांचा निषेध असो, डॉ. बोंडेविरुद्ध नारेबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान पोलिसांनी रास्ता रोको व नारेबारी करणाऱ्या नितीन मोहोड, प्रदीप बाजड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना 'डिटेन' केले.राष्ट्रवादीही उतरली टोलमुक्तीसाठीटोल मुक्तीच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू महल्ले, माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, गुडडु धमार्ळे कार्याध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस, धीरज श्रीवास नितीन देशमुख, गुड्डू ढोरे, अभिजित धर्माळे आदी सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांना जबरीने कोंबले पोलीस व्हॅनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:51 PM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नांदगाव पेठ टोलनाक्यावर टोलमुक्तीसाठी रास्तारोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरीने पोलीस व्हॅनमध्ये टाकले. पोलिसांनी २५ ...
ठळक मुद्दे२५ ते ३० जण 'डिटेन' : रास्ता रोकोनंतर पोलिसांची कारवाईटोलमुक्ती