शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धक्कादायक, कपाशीत बीटी जीन्संच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 7:53 PM

कृषी विभागाने मात्र याच बियाण्यांचा प्रमाणित असल्याचा अहवाल दिला होता.

गजानन मोहोड, अमरावती : गतवर्षीच्या हंगामात गुलाबी बोंडअळीला बळी पडलेल्या कपाशीच्या अवशेषाची नागपूरच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत बीटी प्रोटीन तपासणी करण्यात आली. या अहवालानुसार कपाशीमध्ये बीटीचे जीन्स नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. कृषी विभागाने मात्र याच बियाण्यांचा प्रमाणित असल्याचा अहवाल दिला होता. बीटीच्या नावावर बियाणे कंपन्यांनी कृषी विभागाच्या संगणमताने ही संघटितपणे केलेली लूटच असल्याची बाब या अहवालाने उघड झाली.नागपूरच्या बीज परीक्षण प्रयोग शाळेच्या अहवालानुसार बीटीच्या ‘इलीसा’ टेस्टमध्ये बीजी-२ या वाणात ‘सीआरवाय १ एसी’ बीटी जीन निरंक असल्याचे आढळून आलेत. वास्तविकता याचे प्रमाण हे २५० ते ४५० टक्के असावयास पाहिजे असे अकोला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ राठोड यांनी सांगितले, ‘सीआरवाय २ एबी’ यामध्ये जीन्सचे प्रमाण ७६ टक्के आढळून आले वास्तविकता हे प्रमाणदेखील २५० ते ४०० टक्कयांपर्यत असावयास पाहीजे.नॉन बीटी बियाण्या (बीजी-१) मध्ये बीटी जीन्सचे प्रमाण झिरो पाहिजे असताना यामध्ये एक ते तीन टक्के असल्याचा अहवाल आहे.जिल्हास्तरीय समितीने भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील उमेश महिंगे यासह अन्य शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली व जीएचआय प्रपत्राचा अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला, यामध्ये कपाशीचे ९० ते ९५ टक्के बोंड ही गुलाबी बोंड अळीने बाधित असल्याचे स्पष्ट केले व पाहणीदरम्यान कपाशीचे पाने, फुले व बोंड यांचे नमुने घेऊन बीटी प्रोटीन तपासणीकरिता नागपूरच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले, हा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला, मात्र, संबंधित शेतकºयांना देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार उमेश महिंगे यांनी नागपूरच्या प्रयोगशाळेत माहिती अधिकारात माहिती मागितली असता कृषी विभाग माहिती देण्यास टाळाटाळ का करीत आहे, याचे कारण उघड झाले. यासंदर्भात कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाकडे संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

कृषी विभागाच्या अहवालात सर्व नमुने प्रमाणितजिल्हास्तरीय समितीने घेतलेले नमुने विश्लेषणासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाच्या सुपूर्द करण्यात आले. याविषयीचा अहवाल शेतकºयांनी मागितला असता टाळाटाळ करण्यात आली. मात्र, माहितीच्या अधिकारात अहवाल मिळविला असता सर्व नमुने प्रमाणित असल्याचे दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. वास्तविकता नागपूरच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेने या सर्व नमुन्यात बीटी जीन्सचा अभाव असल्याची बाब स्पष्ट केल्याने कृषी विभागाद्वारा बियाणे कंपन्यांना वाचविण्याचा प्रकार उघड झाला आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी