शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

मेळघाटात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राकरिता कृषी विद्यापीठातर्फे शासनास प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:09 AM

चिखलदरा हे पर्यटनस्थळ असल्याने स्थानिक बाजारात किंवा जागेवरच स्ट्रॉबेरी विकून चांगला नफा शेतकऱ्यांना होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार ...

चिखलदरा हे पर्यटनस्थळ असल्याने स्थानिक बाजारात किंवा जागेवरच स्ट्रॉबेरी विकून चांगला नफा शेतकऱ्यांना होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार पटेल यांनी कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांंशी संपर्क साधून विद्यापीठाचे संशोधन केंद्र मेळघाटात व्हावे, अशी मागणी केली. त्या मागणीला प्रतिसाद देत विद्यापीठाने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) यांच्याकडे संशोधन केंद्राचा प्रस्ताव सादर केला.

संशोधन केंद्राच्या माध्यमातून स्ट्राबेरी उत्पादक शेतकऱ्यांकरिता तंत्रज्ञान केंद्राचा विकास, स्ट्राॅबेरी पिकात गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगास चालना, मृद् व्यवस्थापनाचा अभ्यास करून या पिकावर येणाऱ्या किडी व रोगांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना, स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रचार व प्रसार आणि प्रशिक्षण तसेच कृषी पर्यटनाला चालना देऊन आदिवासी भागात रोजगार निर्मिती असे विविध उद्देश प्रत्यक्षात आणले जातील. या संपूर्ण केंद्राकरिता शास्त्रज्ञ, अधिकारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती तसेच प्रकल्प राबविण्याकरिता ११६०.१५ लाख रुपयांचा हा प्रस्ताव मंजुरीकरिता सादर केला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याकरिता पाठपुरावा करावा, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बॉक्स

स्ट्राॅबेरी संशोधन केंद्र निर्माण झाल्यास मेळघाटातील आदिवासी शेतकरी बांधवांना अतिशय कमी दरात रोपे उपलब्ध होतील तसेच स्ट्राॅबेरीच्या स्थानिक जाती विकसित करता येतील. शीतगृह, साठवणगृह तयार झाल्यास स्ट्राॅबेरीचे फळ जास्त दिवस टिकवून ठेवता येतील.

- डॉ. शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.