शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

बोगस कपाशी बियाण्यांवर ‘कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखांची ४४२ पॅकेट जप्त 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 18, 2023 2:38 PM

प्राथमिक चौकशीत गुजरातमधून माल आणल्याचे समोर आले आहे.

अमरावती : पेरणीच्या तोंडावर कपाशीच्या बोगस बियाण्यांचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे दिसून येते. कृषी विभागानेच शनिवारी उशीरा डमी ग्राहक बनून याचा भंडाफोड केला. यामध्ये ३.६७ लाख किंमतीचे बोगस एचटीबीटीचे ४४२ पाकिटे जप्त करण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशीत गुजरातमधून माल आणल्याचे समोर आले आहे.दहा दिवसांपूर्वी नेरपिंगळाई येथे प्रतिबंधित एचटीबीटीची ५० पाकीट जप्त करण्यात येत नाही तोच १७ जूनला पुन्हा कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. अशोक भाटे (३७, रा. देशमुख लॉनजवळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भाटे हा शनिवारी सायंकाळी सुरुची इन बारजवळ येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळताच एसएओ राहूल सातपुते, एडीओ गोपाळराव देशमुख यांच्यासह पथकातील अधिकारी व गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचना व आरोपी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याचे चारचाकीची पाहणी केली असता मागच्या सीटवर व डिक्कीमध्ये तसेच त्याच्या शिक्षक कॉलनीतील घरातून कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची ४४२ पाकीट जप्त करण्यात आली. यासोबतच वाहन आदी ८,७७,१०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत जिल्हा कृषि अधिकारी अजय तलेगावकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दादासो पवार, कृषि अधिकारी उद्धव भायेकर, पवनकुमार ढोमणे, रविकांत उईके यांच्यासह पीएसआय राजकिरण येवले , पोहेका जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, योगेश पवार सहभागी होते.या प्रकरणी उद्धव भायेकर यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली असता आरोपी अशोक गुलाबराव भाटे याचेविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, बियाणे नियम १९६८ नियम ७ व ८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ खंड ३, ९ बियाणे अधिनियम १९६६ कलम ७(सी) पर्यावरण(संरक्षण ) अधिनियम १९८६ कलम १५ , महाराष्ट्र कापूस बियाणे २००९ कलम १२ (९) अन्वये गुन्हा नोंद केला आला. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीcottonकापूस