कार्यक्रमाला नासाजीव एकीकृत प्रबंधन नागपूरचे डॉ . ए .के बोहरीया, डॉ . मनीष मोंढे मार्गदर्शक म्हणून तर अध्यक्षस्थानी सरपंच रत्ना महल्ले , प्रमुख उपास्थिमध्ये उपसरपंच राहूल बोडखे, कृषी सहाय्य्क तरार , कडू , उपस्थित होते . डॉ . बोहरीया यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले नियंत्रणाच्या पद्धती कोणत्या, ट्रायकोग्रोमा द्वारे किडीचे नियंत्रण कसे करता येईल . हे समजून सांगितले . डॉ . मनीष मोंढे यांनी एकात्मिक कीडनियंत्रण आणि ट्रायकोडरमा य विषयी मार्गदर्शन केले . तर डॉ . सुरेश नाईक , महेश टणक , डॉ . राखी कदम , यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले . यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते . कार्यक्रमाकरिता नासाजीव एकीकृत प्रबंधन नागपूर सदस्य आणि कृषी विभागाने परिश्रम घेतले
पेठ मांगरूळी येथे कृषी गोष्टी कार्यक्रम संपन्न ! एकात्मिक कीड व्यवस्थापनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:17 AM