संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे.जड वाहने, ट्रक, इतर खासगी वाहनांतून वायूप्रदूषण होत आहे. परंतु १५ वर्षे सतत चाललेल्या परिवहन महामंडळाच्या नादुरुस्त व भंगार बसेस स्क्रॅप करायला हव्या आहेत. तसा नियमदेखील आहे. मात्र, १० लाख किमी अंतर कापल्यानंतरही त्या बसेस रस्त्यावर चालविण्याचा प्रताप महामंडळ प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शहरातील प्रदूषण थांबविण्याकरिता कचरा जाळण्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना दुसरीकडे या भंगार बसेस राजरोस काळा धूर सोडून शहरातील वातावरण दूषित करीत आहे. याकडे प्रशासनाची नजर का जाऊ नये, असा सवाल नागरिकांचा आहे. काळा धूर आरोग्यास घातक आहे. यातून श्वसनलिकेसंदर्भातील आजार उद्भवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. जिल्ह्यात एकूण ४५० बसेस सेवेत आहेत. त्यापैकी ५० ते ६० बसेस भंगार झाल्या आहेत. त्या बसेसच्या फेºया मध्यवर्ती आगारातून होत असल्याने काळा धूर ओकत त्यांचा प्रवास सुरू आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान परतवाडा आगाराची एमएच ०७ सी ७१४० क्रमांकाची बस गाडगेनगर चौकातून अमरावती आगारात जात असताना काळा धूर ओकत राजरोजसपणे धावत होती. सायलन्सरमधून निघणाºया काळ्या धुरामुळे वातावरण दूषित होत होते. रोज अशा अनेक बसेस धावत असताना प्रशासन कारवाई केव्हा करणार? व भंगार बसेस रस्त्यावर धावणे केव्हा थांबणार, असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांचा आहे.प्रत्येक बसेसची तपासणीराज्य महामार्ग परिवहन विभागाच्या प्रत्येक बसेस पासिंगसाठी आरटीओत आणल्या जातात. अॅटोमॅटिक यंत्राव्दारे तपासणी केली जाते. पीयूसी, ब्रेक, लाईट, इंडिकेटर,इंजीनची तपासणी केली जाते तरही भंगार बसेस धूर ओकत रस्त्यावर धावतात कशा, असा सवाल नागरिकांचा आहे.श्वसनाच्या आजारात वाढवायूप्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे श्वसनाचा आजार बळावतो. प्रदूषणामुळे व्यक्तींच्या संपूर्ण शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होतो. याची लक्ष्णे स्पष्ट दिसत नसली तरी त्याचा परिणाम कित्येक वर्षे हळूहळू होत राहतो, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
भंगार बसेसमुळे वायुप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:31 AM
काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे.
ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाला केव्हा येणार जाग?