आॅनलाईन लोकमतअमरावती : बेलोरा विमानतळाच्या विकासात अडसर ठरणारा जमिनीवरील अडथळ्यांचा (ओएलएस) सर्वेक्षण सुरू झाले आहे. ओएलएस सर्वेक्षण ८ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, धावपट्टीवरून ४ ते १५ किमीपर्यंत अडथळे कॅमेऱ्यात कैद केले जात आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने विमानतळाच्या विकासाचा टप्पा गाठला जात आहे.बेलोरा विमातळाचे प्रबंधक एम.पी. पाठक यांच्या मार्गदर्शनात दिल्ली येथील आयीसीटीआय या कंपनीची चमू विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण करीत आहे. २४ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान हे सर्वेक्षण चालणार असल्याची माहिती आहे. ओएलएस सर्वेक्षण अहवालशिवाय विमानतळाच्या विकासाचा पुढील टप्पा गाठता येणे शक्य नव्हते. ही बाब बेलोरा विमानतळ प्रबंधकांनी राज्य शासन व केंद्रीय विमानपतन प्राधिकरणाला कळविली होती. त्याअनुषंगाने आ. सुनील देशमुख यांनी बेलोरा विमानतळ विकासाचे जुने शासन निर्णय रद्द करणे आणि ओएलएस सर्वेक्षणास निधी मंजूर करणे हे दोन महत्त्वपूर्ण टप्पे गाठण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे विमानतळाच्या प्रस्तावित विकासकामांचा मार्ग सुकर झाला आहे. ओएलएस सर्वेक्षण करताना चमूकडून विमानतळाच्या दोन्ही बाजू तपासल्या जात आहे. विमानांचे लॅण्डिंग आणि टेकअप होताना धावपट्टीपासून ४ ते १५ किमी अंतरापर्यंत जमिनीवर टॉवर, वीटभट्टी चिमणी, होर्डिंग्ज, इमारत बांधकाम आदी अडथळे येत असल्यास ते कॅमेऱ्यात कैद केले जात आहे. धावपट्टीपासून मागील बाजू (फनेल एरिया) ची रेंज तपासताना १५ किमी अंतर लक्ष केले जात आहे. या सर्वेक्षणात एआरपी पॉर्इंट बघून विमानांचे टेआॅफ आणि लॅण्डिंग दरम्यान येणारे अडथळे टिपले जात आहेत. धावपट्टीवरून ७ किमी अंतरावर अंजनगाव बारी परिसरात एक टेकडी अडथळा म्हणून सर्वेक्षण अहवालात नोंद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बेलोरा ते जळू या गावादरम्यान यवतमाळ राज्य मार्गाला जोडणारा वळण मार्ग वाहतुकीसाठी लवकरच सुरू होणार आहे.डिझाईन, प्लॅनिंगनंतर विकासकामांना प्रारंभओएलएस सर्वेक्षण अहवालास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंगनंतर विकासकामांना प्रारंभ होईल. यात धावपट्टीची लांबी वाढविणे, एटीएस टॉवरची निर्मिती, टर्मिनस बिल्डिंग निर्मिती, अग्निशमन यंत्रणा उभारणे, विश्रामकक्ष आदी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.ओएलएस सर्वेक्षण म्हणजे काय?विमानतळावर विमानांना लॅण्डिंग किंवा टेकअप घेताना जमिनींवर कोणतेही अडथळे राहू नये, यासाठी आॅप्टॅकल लिमिटेशन सरफेश (ओएलएस) सर्वेक्षण केले जाते. धावपट्टीवरून डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूवरून जमिनीवरील येणारे अडथळे तपासले जातात. दरम्यान काही अडथळे आल्यास तसा अहवाल राज्य शासन आणि विमानतळ प्राधिकरणाला कळविला जातो.ओएलएस सर्वेक्षण होणे म्हणजे विमानतळाचे विकासाचे अडथळे दूर होणे आहे. आता पुढील टप्पा डिझाईन, प्लॅनिंग तयार केले जाईल. विमानतळाच्या विकासासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून, त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.सुनील देशमुख, आमदार, अमरावती
विमानतळाचे ‘ओएलएस’ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:30 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : बेलोरा विमानतळाच्या विकासात अडसर ठरणारा जमिनीवरील अडथळ्यांचा (ओएलएस) सर्वेक्षण सुरू झाले आहे. ओएलएस सर्वेक्षण ८ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, धावपट्टीवरून ४ ते १५ किमीपर्यंत अडथळे कॅमेऱ्यात कैद केले जात आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने विमानतळाच्या विकासाचा टप्पा गाठला जात आहे.बेलोरा विमातळाचे प्रबंधक एम.पी. ...
ठळक मुद्देवळण मार्ग लवकरच सुरू : पालकमंत्री प्रवीण पोटे, सुनील देशमुख यांचे प्रयत्न सार्थकी