लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : स्थानिक पांढुर्णा मार्गातील नादुरुस्त कारमध्ये अजय पंधरेचा मृत्यू हा गुदमरल्याने झाल्याचा न्यायवैद्यक व शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मंगळवारी उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे या प्रकरणाला विराम मिळाला आहे.शिक्षक कॉलनी परिसरालगतच्या शेतातील झोपडीत शेतमजूर कैलास पंधरे पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आईसह वास्तव्यास होते. त्यांचा सात वर्षीय मुलगा अजय हा पुसला येथील जयभवानी आदिवासी आश्रमशाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणून घरी आला होता. ५ मे रोजी आई-वडील कामावर निघून गेल्यावर आजीसोबत तो घरी होता. काही वेळाने तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, परतलाच नाही. त्याचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. उपनिरीक्षक प्रिया उमाळे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू झाला. अखेर तब्बल पाच दिवसांनी श्रीसाईराम वॉशिंग सेंटरच्या बाजूला नादुरुस्त कारमध्ये त्याचा मृतदेह मिळाला.अजयच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना पाचारण केले होते. त्यांच्याकडून मंगळवारी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये त्याचा मृत्यू हा कारमध्ये श्वासोच्छवासात त्रास उद्भवल्याने झाल्याचे नमूद केले आहे. यामुळे या प्रकरणाला विराम मिळाला आहे. ठाणेदार दीपक वानखडे, उपनिरीक्षक प्रिया उमाळे, जमादार गजानन गिरी, उमेश ढेवले, संदीप वंजारी, शेषराव कोकरे, अरविंद गिरी, अशोक संभे, स्वप्निल काकडे, सागर लेवलकर, चालक तायडे, वैशाली सरवटकर, सोनल खानळे आदींनी प्रकरणाचा तपास केला.
अजयचा मृत्यू कारमध्ये गुदमरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:15 AM
स्थानिक पांढुर्णा मार्गातील नादुरुस्त कारमध्ये अजय पंधरेचा मृत्यू हा गुदमरल्याने झाल्याचा न्यायवैद्यक व शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मंगळवारी उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे या प्रकरणाला विराम मिळाला आहे.
ठळक मुद्देन्यायवैद्यक अहवाल : अपहरणाचा संशय मावळला