शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

Akola Lok Sabha Results 2024 : अमरावतीत मतमोजणी निर्णायक वळणावर

By जितेंद्र दखने | Published: June 04, 2024 2:25 PM

Akola Lok Sabha Results 2024 : महायुतीच्या नवनीत राणाची आघाडी पण कॉग्रेस उमेदवाराचे तगडे आव्हान; ७ फेऱ्यांमध्ये ४ लाख ५३ हजार २८४ मताची मोजणी पूर्ण

जितेंद्र दखने, अमरावती

Akola Lok Sabha Results 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मध्यमगतीने सुरू असून ती आता निर्णायक टप्प्यात आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मतमोजणीच्या २० पैकी ७  फेऱ्या पुर्ण झाल्या असून प्रारंभपासूनच महायुतीच्या नवनीत राणा  यांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली आहे. त्यांना कॉग्रेसचे बळवंत वानखडे  हे चांगली टक्कर देत असून उर्वरीत १३ फेऱ्यामध्ये काय उलटफेर होतो याकडे लक्ष लागून राहाले आहे.वर्तमान स्थितीत महायुतीच्या नवनीत राणा यांनी  २ हजार ५४४ मतांची आघाडी घेतलेली आहे. त्यांना ७ व्या फेरी अखेर २ लाख १ हजार ९४७ मते मिळाली असून कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना १  लाख ९९ हजार ४०३ मते मिळाली आहे.  प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी  ३१ हजार ४५७ मते घेतली आहे.

अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये २६ एप्रिल रोजी अर्थात दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. त्यामध्ये ११ लाख ६९ हजार १२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी आतापर्यंत ०७ फेऱ्यामध्ये ४ लाख ५३ हजार २८४ मतांची मोजणी झाली असून अद्यापही ७ लाख १५ हजार ८३७ मते मोजणे बाकी आहे.त्यामुळे आता उर्वरित फेऱ्यांमध्ये मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होईल.

सन २०१९ मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थित उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना ५ लाख १० हजार ९४७ मते मिळाली होती. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणांनी ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत एकूण २४ उमेदवार रिंगणात होते. दलित. मुस्लीम मतांसह प्रोगामी विचारसरणीच्या मतदारांचा त्यावेळी नवनीत राणा यांना भक्कम पाठिंबा होता. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये देशात मोदीची लाट असताना नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या; मात्र यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राणा या भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. २०१९ च्या निवडणुकीनंतर नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून त्या एनडीएसोबत आहेत. मात्र राणांचा हा निर्णय पुरोगामी विचारसरणीच्या मतदारांना रुचला नाही. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार विरोधात गेल्याचे दिसून आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा