फोटो पी ०४ अळणगाव
भातकुली : तालुक्यातील अळणगाव ते कुंड (खुर्द) या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा, असा प्रश्न दोन्ही गावातील नागरिक व वाहनचालकांना पडला आहे. या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेने गांभीर्याने लक्ष घातले नाही. या रस्त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अळणगाव ते कुंड (खुर्द) हे चार किमी अंतर असून हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अळणगाव येथील नागरिकांचा दररोज अमरावती शहराशी संपर्क येतो. अळणगाव व कुंड ही दोन्ही गावे निम्न पेढी प्रकल्प बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे येथे विकास व रस्ते दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना तीनही ऋतूंमध्ये कसरत करावी लागत आहे.