शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

जिल्ह्यात दारुचा महापूर

By admin | Published: October 13, 2014 11:15 PM

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात अवैध दारु विक्रीला उधाण आले आहे. त्या अनुषंगाने कारवाईच्या दृष्टीने पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात अवैध दारु विक्रीला उधाण आले आहे. त्या अनुषंगाने कारवाईच्या दृष्टीने पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ७ ते ८ कारवाई होत आहेत. त्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारु विक्रेत्यावर पोलिसांची करडी नजर आहे. शनिवारी व रविवारी दिवसभरात पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून हजारो रुपयांची अवैध दारु जप्त केली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवाथेनगर चौकात आरोपी भय्यालाल किसनलाल हटवार (४५, रा. देशपांडे प्लॉट) याच्याकडून पोलिसांनी २४ नग देशी दारुच्या पावट्या जप्त केल्यात. तर चिचफैल भागात आरोपी विशाल रमेश कोरटकर याच्याकडून विदेशी दारुचा २० हजार ५० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. शहर कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चित्रा चौकात आरोपी अब्दुल कलीम अब्दुल सत्तार (४५, रा. हबीब नगर) व शेख इरफान शेख अयुब (२०, रा. खुर्शीदपुरा) याच्याकडून पोलिसांनी ४८ नग विदेशी दारुच्या पावट्या जप्त केल्या. राजकमल चौकात आरोपी मुस्तफा राजू चौधरी (२६, रा. फे्र जरपुरा) याच्याकडून ४८ नग देशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्यात. शाम चौकात आरोपी राजेश प्रकाश जाधव यांच्याकडून ४८ देशी दारुच्या बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टाकरखेडा संभू येथे आरोपी नरेश गणपत पाटील याच्याकडून पोलिसांनी १२ नग देशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. तसेच नांदुरा येथे आरोपी अशोक नथ्थुजी इंगळे (४७, रा. थूगाव पिंपरी) याच्याकडून पोलिसांनी १९ नग देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्रीला उधाण आल्याने ही कारवाईची मोहिम पोलीस विभागाकडून राबविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)