शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

आल्हाद काळे ठरला ‘रायसोनी व्हॉईस आॅफ अमरावती’

By admin | Published: December 26, 2015 12:18 AM

युवकांना दिशा देणारे एक सशक्त व्यासपीठ लोकमत युवा नेक्स्ट व शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी ...

अंतिम फेरी जल्लोषात : लोकमत युवा नेक्स्ट, रायसोनी ग्रुपचा उपक्रम अमरावती : युवकांना दिशा देणारे एक सशक्त व्यासपीठ लोकमत युवा नेक्स्ट व शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी कटिबध्द असलेल्या रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन (सिनिअर व ज्युनिअर) युवक-युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा घेण्यात आली. ‘व्हॉईस आॅफ अमरावती’ या शीर्षकांतर्गत बुधवारी ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ डिसेंबर रोजी टाऊन हॉल येथे पार पडली. यामध्ये २२ स्पर्धकांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. स्पर्धेची अंतिम फेरी २३ डिसेंबर रोेजी स्थानिक केशवराव भोसले सभागृहात अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जवलन करून करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी तरूण-तरूणींनी एकापेक्षा एक सरस हिंदी व मराठी गीते सादर केलीत. उपस्थित श्रोेत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. स्पर्धेत दर्यापूरचा आल्हाद काळे याने ‘सूर निरागस हो..’ हे गाणे दमदार पध्दतीने सादर करून स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावला तर प्रणय चक्रवर्ती याने प्रसिध्द पार्श्वगायक कैलास खेर यांचे ‘सैय्या..’ हे गीत अनोख्या पध्दतीने सादर केले. त्याला स्पर्धेचा द्वितीय विजेता घोषित करण्यात आले. तर प्रज्ज्वल खंडारे याने अग्निपथ चित्रपटातील गाजलेले ‘अभी मुझमे कहीं बाकी थोडी..’ हे गीत सादर केले. त्याला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांकाचा विजेता घोषित करण्याकरिता परीक्षकांची तारांबळ झाली. प्रज्ज्वल खंडारे आणि अस्मिता काळे यांच्यामध्ये ‘टाय’ झाल्याने दोघांनाही आणखी एक-एक गाणे सादर करण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये प्रज्ज्वल खंडारे विजेता ठरला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आलीत. स्पर्धेत गायकांना वीरेंद्र गावंडे यांनी आॅक्टोेपॅडवर, रामेश्वर काळे की-पॅड, विशाल पांडे ढोलकी तर मनीष पाटील यांनी गिटारवर उत्कृष्ट साथसंगत दिली. स्पर्धेला तरूण-तरूणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची रंगत कुंदा पुसदकर व नयन बोकाडे यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने अधिकच वाढली होती. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिध्द पार्श्वगायक गुणवंत डहाणे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या रोशनी दर्जी यांनी केले. या कार्यक्रमात रायसोनी ग्रुपचे हेमंत सोनारे, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत इंगोले, उपप्राचार्य नितीन मांडवगडे, रायसोनी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रवीण वानखडे, रायसोनी मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्य, पल्लवी मांडवगडे, नगरसेविका अर्चना इंगोले. विशेष सहकार्य रायसोनीचे रवींद्र चव्हाण, मंगेश निचत, 'लोेकमत'चे रवी खांडे, जयंत कौलगिकर, स्वाती बडगुजर, शीतल चौहान आदींची उपस्थिती होती. स्पर्धेचे रसाळ व ओघवते संचालन करून पवन नालट यांनी दर्शकांना खिळवून ठेवले. संचालनादरम्यान केलेली कविता, चारोळ्या आणि शेरो-शायरीची बेमालूम पेरणी करून त्यांनीही संचालनादरम्यान टाळ्या घेतल्या. (प्रतिनिधी)