चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह परिक्षेत्रातील अवैधरीत्या प्रवेश करून सायळ प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या चारही आरोपींचा जामीन शनिवारी अचलपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक २ जी बी औंधकर यांच्या न्यायालयाने फेटाळला.
पुन्या बेठेकर, भानू कास्देकर, अशोक कास्देकर व रितेश कास्देकर (रा. सर्व माखला) अशी सायळ प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कुऱ्हाडीच्या साहाय्याने सेमाडोह परिक्षेत्रातील माखला वर्तुळाचे पश्चिम माखला बिटमध्ये शिकार केली होती. ट्रॅप कॅमेरात सदर प्रकार दिसून आला. त्यांना २८ दिवसांनंतर अटक करण्यात आली होती. शनिवारी आरोपीच्या जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु सहायक सरकारी अभियोक्ता गोविंद विचोरे यांनी बाजू मांडली त्यावर अचलपूर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
बॉक्स