९८.३६ टक्के जलसाठा, नळ, दमयंती नदीला पूर, मोर्शी-वर्धा महामार्गावरील वाहतूक बंद
मोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचे ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्व १३ वक्र दारे ११० सेंटिमीटरने उघडण्यात आले. त्यामधून २१३७८ दलघमी प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मोर्शी-आर्वी-वर्धा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धरणाच्या नदीकाठावरील गावांना अति सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पहिल्यांदाच ७ सप्टेंबर रोजी अप्पर वर्धा धरणात ९३ टक्के जलसाठा झाला होता. परिणामी धरणाचे दोन दारे दुपारी ४ वाजता ५ सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. त्यामधून केवळ १६ दलघमी प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पुन्हा संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे मध्य प्रदेशातील जाम नदी, पाक नदी, सालबर्डी येथून वाहणाऱ्या माडू नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. मोर्शी शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या नळा व दमयंती नदीला पूर आल्यामुळे अप्पर वर्धा धरणात पाण्याची आवक वाढली. परिणामी धरण ९८.३६ टक्के भरले. त्यामुळे रात्री १२ वाजता अप्पर वर्धा धरणाचे एक दार पुन्हा उघडण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता पुन्हा दोन दारे उघडण्यात आल्याने अप्पर वर्धा धरणाचे एकूण पाच दारे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. त्यामधून २०० दलघमी प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, धरणात पाण्याची आवक लक्षात घेता, रात्री ११ वाजता अप्पर वर्धा धरणाचे १३ वक्र दरवाजे उघडण्यात आले.
शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाचे पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी आहे. सध्या अप्पर वर्धा धरणाची लेव्हल ३४२.४० झाली आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा ५५४.८१ असून पाण्याची आवक १३८५ दलघमी प्रति सेकंद सुरू आहे.
------------------
पर्यटकांची गर्दी
अप्पर वर्धा धरणाचे दारे केव्हा उघडतात, याची प्रतीक्षा अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील नागरिकांना असते. त्यामुळे १३ दारे उघडण्यात आल्याची वार्ता पसरताच पर्यटक आणि वाहनांची गर्दी सकाळपासून धरण परिसरात झाली आहे. उपविभागीय अभियंता रमण लायचा, शाखा अभियंता गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी दत्तू फंदे अनुचित घटना टाळण्यासाठी लक्ष ठेवून आहेत.
-------------------
नदीकाठावरील गावांना इशारा
अप्पर वर्धा धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठी येणाऱ्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणाचे पाणी .. नदीत ओसंडून वाहत आहे.