लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन..भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला वेगळे महत्त्व आहे. हा सण तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा आहे. मतदार संघातील ७५ हजार बांधवांच्या हातातील अनेक राख्यांपैकी एक राखी ही आ. यशोमतींची आहे. मागील ११ वर्षापासून आ. यशोमती आपल्या मतदारसंघातील प्रत्येक बंधूंच्या घरी राखी पाठवित आहेत. यंदाही त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे.रक्षाबंधनाचा सण हा खऱ्या अर्थाने दृष्टी परिवर्तनाचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधन भावाचे हृदय प्रेमाने जिंकते. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम हे निस्वार्थी अन् पवित्र आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये या नात्यामधील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. आ. यशोमती ठाकूर यांचेद्वारा मतदार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधी विधिमंडळात, तर कधी रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करतात. मतदारांनी आपल्याला निवडून दिले म्हणून ती आपली जबाबदारी आहे. त्यासाठीच आपली बांधिलकी आहे, अशी त्यांची भावना आहे. मतदारसंघाशी आपला भावनिक संबंध असल्याचेही त्या सांगतात. त्यामुळेच की काय, वेळोवेळी त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणूनही गरीब व दुर्धर आजारग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्याच नैतिकतेचा एक भाग म्हणून गत ११ वर्षांपासून त्या कार्यकर्त्यांच्यामार्फत मतदारबंधूंच्या घरोघरी जाऊन राख्या पाठवित आहेत. यंदाही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी बंधूंसाठी ७५ हजार राख्या पाठविल्या आहेत.विदर्भातील एकमेव महिला आमदारविदर्भातील एकमेव महिला आमदार आमदार असलेल्या यशोमती ठाकूर महिलांच्या प्रश्नांसाठी केवळ सभागृहातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी बाजू लावूण धरतात जेवढ्या पोटतिडकीने त्यांनी मतदार बांधवाच्या प्रश्नांचा रेटा सतत ठेवला आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांचा अविरत संघर्ष सुरू आहे.प्रत्येक मतदारबंधुशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळेच ही भावंड आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. नात्यात कर्तव्य केव्हाही मोठं असतं. बाबांचीही आपल्याला तिच शिकवण होती. त्यानुसार आपण गेली ११ वर्षे नाते जोपासण्याचे काम करीत आहे.- यशोमती ठाकूर, आमदार.
मतदारसंघातील प्रत्येक बांधवाच्या घरी तार्इंची राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:27 PM
रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन..भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला वेगळे महत्त्व आहे. हा सण तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा आहे. मतदार संघातील ७५ हजार बांधवांच्या हातातील अनेक राख्यांपैकी एक राखी ही आ. यशोमतींची आहे.
ठळक मुद्दे७५ हजार मतदार बंधुंशी यशोमती ठाकुरांची बांधिलकीबंधनांची दशकपूर्ती