येवदा : कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यापासून एसटी बस बंद आहेत. मात्र, अनलॉक-४ मध्ये एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागातील एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खाजगी प्रवासी वाहतुकीला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. अनलॉक झाल्यापासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बस सोडण्यात येत आहेत. मात्र, तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बस सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
-------------
दहिगाव रेचा येथे जागतिक मृदा दिन
अंजनगाव सुर्जी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत येथे जमीन आरोग्य पत्रिका पथदर्शी प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले. या मृदा दिन कार्यक्रमाला शेतकरी अमोल घोगरे, मंडळ कृषी अधिकारी जी.आर. मोरे, कृषिसहायक एन.व्ही. फुंडकर, व्ही.पी. कंकाळे, एन.ए. राऊत, के.टी.उके उपस्थित होते.