शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

काजलडोह शाळेतील सर्व शिक्षक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:05 AM

मेळघाटातील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची ओरड सातत्याने होत असते. शिक्षकांची अनास्था हे देखील यामागील एक प्रमुख कारण आहे.

पं.स.सदस्य, सरपंचांची आकस्मिक भेट : पंचनाम्यानंतर शाळेला ठोकले कुलूप लोकमत न्यूज नेटवर्कचुर्णी : मेळघाटातील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची ओरड सातत्याने होत असते. शिक्षकांची अनास्था हे देखील यामागील एक प्रमुख कारण आहे. नजीकच्या काजलडोह येथील जि.प.पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत सर्व सहाही शिक्षक बेपत्ता आढळून आले. पं.स.सदस्य व सरपंचांनी सोमवारी या शाळेला दिलेल्या आकस्मिक भेटीतून मेळघाटातील शिक्षणाची दुरवस्था उघड झाली. सहापैकी एकही शिक्षक हजर नसल्याने पं.स.सदस्यांसह सरपंचांनी या शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांना सुटी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.चिखलदरा शहरातील शाळांची अवस्था अशीच विदारक आहे. येथील शाळांमध्ये शिक्षकांचा पत्ताच नसतो. पं.स. सदस्य प्रतिभा रोहित कंगाले व सरपंच कांताबाई यांनी सोमवारी काजलडोह शाळेला भेट दिली. यावेळी वर्गखोल्यांना कुलूप असल्याने विद्यार्थी वऱ्हांड्यात बसून होते. विद्यार्थ्यांना विचारणा केली असता शिक्षक अनुपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार न करता एकाचवेळी अनुपस्थित राहणाऱ्या शिवचरण ठाकूर, नारायण बेठेकर, इंगळे, संगीता इसळ, देवराव अमोदे, सुनील झारखंडे या सहाही शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सहा शिक्षकांवर तातडीने कारवाई न झाल्यास शाळेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पालकांनी दिला. यावेळी पं.स. सदस्य प्रतिभा कंगाले, सरपंच कांता कवडे, शाळा समिती अध्यक्ष विनायक काडमू कवडे, सुनील मालू कुमरे, उपाध्यक्ष आशा अचोटे, ग्रापं सदस्य मंगलसिंग कुमरे, मनोज बेलकर, वीरू मरसकोल्हे, संदीप कुमरे, संजय कंकोडे, शालिक इवने, राजेश बेलकर, कलेसिंग उईके, आदी पालकांची उपस्थिती होती.