माजी संचालकांना बदनाम करण्याचे षडयंत्र, आरोग्य सिध्द करण्याचे आवाहन
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपासून विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, हे सर्व आरोप तथ्यहीन असून, आगामी निवडणुका लक्षात घेता विरोधकांनी बँकेला व बँकेच्या माजी संचालकांना बदनाम करण्याचे प्रयत्न चालविल्याचे बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले.
गत १० वर्षांत कधी नव्हे एवढा नफा बँकेला संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाला आहे. ज्या ७०० कोटी संदर्भात आरोप होत आहे, ते सर्व पैसे बँकेकडे सुरक्षित असून, या ७०० कोटींवर २७३ कोटी ८६ लाख रुपयांचे व्याज बँकेत जमा असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. माजी संचालक मंडळाने गुंतवणुकीसंदर्भात धोरण ठरविले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जी ७०० कोटींची गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीवर ऑडिटसुद्धा करण्यात आले. परंतु यात कुठल्याही प्रकारचे ऑब्जेशन घेले नसताना नाबार्डचेदेखील यावर आक्षेप नाही. मात्र, काही विरोधकांनी नाहक माजी संचालकांसह बँकेची बदनामी करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप बँकेच्या माजी संचालकांनी केला आहे. एकेकाळी डबघाईसच्या वाटेवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गत १० वर्षांपूर्वी सहकार पॅनेलच्या नेतृत्वात बँकेचा कारभार संचालक मंडळाने हाती घेतला. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बँकेतील ठेवी २२०० कोटी पर्यंत नेऊन पाेहचविल्यात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता शुभमंगल योजना, गृह योजना, सोने तारण योजना, कर्ज योजना तसेच पगारी कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शिक्षकांकरिता ओव्हर ड्रॉप व अन्य सुविधा देत शेतकऱ्यासह बँकेची देखील आर्थिक दृष्ट्या प्रगती केलेली आहे. दरवर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये आलेच आहे. त्यामुळे आज विदर्भात अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नावलौकिक आहे. बँकेवर नवे संचालक मंडळ आरूढ होताच बँकेला पावणेतीन कोटींचा फायदा व्याजाच्या रुपाने झाला आहे. माजी संचालक मंडळाने बदनामी करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, अनंत साबळे, संजय वानखडे, रवींद्र गायगोले, प्रवीण काशिकर, सुभाष पावडे, प्रदीप निमकर, बाळासाहेब अलोणे, नितीन हिवसे आदी उपस्थित होते.
बाॅक्स
७०० कोटींची गुंतवणूक करताना संचालक मंडळाला अंधारात ठेवून होऊ शकत नाही. १५ हजारांचे कर्ज देताना संचालकांना फोन करावा लागतो. त्यामुळे ज्यावेळी गुंतवणुकीत अधिकाऱ्यांनी घोळ केला. त्याच्या विरोधात गुन्हा का दाखल केला. त्यामुळे यात संचालक मंडळाचा सहभाग नसल्याचे नाकारता येणार नाही आहे.
- प्रताप अडसड,
आमदार धामणगाव रेल्वे
कोट
७०० कोटींची गुंतवणूक करताना जिल्हा बँकेत अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केला, तर या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल केले नाहीत. त्यामुळे संचालक मंडळाने यांना पाठीशी का घातले. परिणामी संचालक मंडळही याला जबाबदार आहे.
- मंगेश देशमुख,
प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष