नरेंद्र निकम।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : योग्य काम नाही म्हणून हातावर हात देऊन बसणारे बेरोजगार आढळतात. मात्र, माधुरी ऊर्फ मधू रामलाल कुमरे (१९) हिने वृत्तपत्र वाटप करून कुटुंबाला हातभार लावते. शहरातील वृत्तपत्र व्यवसायातील मधू ही पहिली ‘डिलिव्हरी गर्ल’आहे. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर तिच्या या कामाची ‘लोकमत’ने खास दखल घेतली.मोर्शी शहरातील ‘लोकमत’चे वितरक अमोल बिजवे यांच्याकडे मधूने पेपर वाटपाचे काम स्वीकारले. आई, वडील व एक बहीण असे चौकोनी कुटुंबातील मधूला घरची परिस्थिती व आजार यामुळे पुढे शिक्षण करता आले नाही. भारतीय महाविद्यालयातून २०१६ मध्ये तिने बारावी कला शाखेत ६४ टक्के गुण प्राप्त केले. वडील गवंडीकाम करतात, तर आई विमल त्यांना साथ देते. बहीण नेहालीदेखील टायफॉइड झाल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. स्टेशनरीच्या दुकानात कमी वेतनात १२ तास काम करावे असल्याने वृत्तपत्र वाटपाचे काम स्वीकारले आहे. एरवी सायकलने वृत्तपत्र वाटण्याचे काम पुरुषांकडून केले जाते. मात्र, मधू हे काम नेटाने करीत आहे. आयटीआयमधून कोर्स करून स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे, असे तिने सांगितले.
मोर्शीची मधू करते वृत्तपत्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:15 AM
योग्य काम नाही म्हणून हातावर हात देऊन बसणारे बेरोजगार आढळतात. मात्र, माधुरी ऊर्फ मधू रामलाल कुमरे (१९) हिने वृत्तपत्र वाटप करून कुटुंबाला हातभार लावते. शहरातील वृत्तपत्र व्यवसायातील मधू ही पहिली ‘डिलिव्हरी गर्ल’आहे.
ठळक मुद्देपहिली ‘पेपर गर्ल’ : परिस्थिती, गरिबीमुळे शिक्षण अर्धवट