अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत दोन दिवस पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रात्री ११ वाजतानंतर ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन राबवून स्वत: हॉटेलचालकांनी झाडाझडती घेऊन दोषींवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पाच तडीपारांसह सहा संशयितांना अटक करण्यात आली. याशिवाय स्वत:जवळ चाकू बाळगून दोघांना अटक करण्यात आले. तसेच चौघांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशीकांत सातव यांच्या नेतृत्वात ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी तडीपारांना ताब्यात घेतले. यात दिनेश पुंडलिक पालवे (२७ रा.चवरेनगर), अशोक उत्तमराव सरदार (३५ रा.जेवडनगर), भारत मोहन दिवटे (३२ रा.माताखिडकी), सुरेश छाटू निखरे (५० रा.लक्ष्मीनगर), रतन वसंत उईके (४१ रा.टोपेनगर) यांचा समावेश आहे.
बॉक्स
संशयितांमध्ये या आरोपींचा समावेश
पोलिसांच्या या मोहिमेत नरेश अरुण आत्राम (४१ रा.जेवडनगर), अंकुश माणिक काळे (२४ रा.बेनोडा), कपिल विनोद स्वर्गे (२३ रा.बेनोडा), विशाल गोवर्धन रामटेके (३२ रा.राहुलनगर), सरफराज अन्सार शेख (२४ रा.पॅराडाईज कॉलनी) व चेतन नरेंद्र थोटे (२० विलासनगर) हे व्यक्ती विविध परिसरात संशयास्पद फिरताना दिसले. त्यांना पोलिसांनी अटक केली.
बॉक्स
चाकू बाळगणाऱ्यांना अटक
या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी शेख जुबेर शेख इकबाल (२७ रा.राहुलनगर) व अनिल गणेश महाजन (रा.आष्टी, वर्धा) यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चाकू आढळून आले. पोलिसांना चौघांवर प्रतिबंध कारवाई केली. तसेच या मोहिमेत पोलिसांनी ११ वाहनांवर कारवाई करून १३ वाहने जप्त केली आहे.