आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाच्या किमान आधारभूत किमतीनुसार धान्य खरेदीचे अधिकार जिल्हाभरात १७ शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार सध्या कृषिउत्पन्न बाजार समितीमार्फत नाफेडची धान्य खरेदी केली जात आहे. मात्र, बरेचदा यात तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे नाफेडसाठी शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचे अधिकार शेतकरी प्रोड्युसर कंपनी महासंघाला द्यावे, अशी मागणी सोमवारी किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाव्दारे केली आहे.जिल्हाभरातील शेतकरी कंपनी आत्मांतर्गत बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन केल्या आहेत. त्यानुसार शेतकरी प्रोड्युसर कंपन्याकडे २ डीपीएच क्षमतेची धान्य साफ -सफाई मशिनरीसुद्धा कार्यान्वित आहे. या माध्यमातून नाफेडमध्ये धान्य खरेदीसाठी १७ ही शेतकरी प्रोड्युसर कंपनीची धान्य खरेदी करण्याची तयारी आहे. या कं पन्यांकडे धान्याची ग्रेडींग क्लिनिंग करून एफएक्यू प्रतिचे धान्य खरेदीस कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. नाफेडसाठी सोयाबीन, तूर, चना व आदी धान्य खरेदीस तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यवतमाळच्या धरतीवर शेतकरी कंपन्यांना धान्य खरेदीचा परवाना शासन निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार शेतकरी प्रोड्युसर कंपनी महासंघाला द्यावी, अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी शेतकरी प्रोड्युसर कंपनी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष मनोहर सुने, कोषाध्यक्ष सुधीर इंगळे आदी उपस्थित होते.
शेतकरी प्रोड्युसर कंपनीला धान्य खरेदीची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 9:04 PM
शासनाच्या किमान आधारभूत किमतीनुसार धान्य खरेदीचे अधिकार जिल्हाभरात १७ शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांना दिले आहेत.
ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांना प्रोड्युसर कंपनी महासंघाचे निवेदन