अमरावती: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत रिक्त असलेली पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुकंपातील पदभरतीसाठी गुरुवारी, २२ डिसेंबर रोजी प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये पदभरतीसाठी आलेल्या १५७ उमेदवारांपैकी ११३ जणांना विविध पदांवर पोस्टिंग देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाचे ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध आहेत आणि ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा पदासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सरळसेवेच्या कोट्यातील, गट क व गट ड मधील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के पदे ही अनुकंपा पदभरतीद्वारे सरळसेवेने भरण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रक्रिया राबविली आहे. या पदभरतीसाठी प्रशासनाकडून १५७ उमेदवारांची सेवा ज्येष्ठता यादीनुसार दस्ताऐवज पडताळणी करण्यात आली.
पात्र ठरलेल्या ११३ जणांना विविध विभागांतील पदांवर पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये ७७ नवीन व यापूर्वी वर्ग ४ मध्ये पदस्थापना दिलेल्या ३६ कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मध्ये पदे अपडेट करून पोस्टिंग दिली आहे, तर उर्वरित ७७ उमेदवारांना वर्ग ३ मध्ये पदस्थापना दिली आहे. ही सर्व प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन प्रक्रियेद्वारे राबविण्यात आली. यावेळी सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे आदीनी पार पाडली. पदभरती कनिष्ठ अभियंता बांधकाम २, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा २,स्थापत्य अभियंता सहायक बांधकाम ०९, स्थापत्य अभियंता सहायक सिंचन १, पर्यवेक्षिका महिला व बालकल्याण २, वरिष्ठ सहायक म. बा. क? २, वरिष्ठ सहायक लेखा १, वरिष्ठ सहायक लिपिक वर्गीय ६, आरोग्य सेवक पुरुष १०, ग्रामसेवक १०, विस्तार अधिकारी कृषी १, विस्तार अधिकारी सांख्यिकी १, कनिष्ठ सहायक लेखा २, कनिष्ठ सहायक लिपिक वर्गील २४ या प्रमाणे पदस्थापना दिली आहे.