शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

रुग्णवाहिका चालकांचा कोरोनाने मृत्यू; सायरन वाजवून अनोखी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:14 AM

फोटो नं इर्विन ते हिंदू स्मशानभूमी दरम्यान १७ ते २० रुग्णवाहिकांचा होता समावेश अमरावती : खासगी रुग्णवाहिका चालक संजय ...

फोटो नं

इर्विन ते हिंदू स्मशानभूमी दरम्यान १७ ते २० रुग्णवाहिकांचा होता समावेश

अमरावती : खासगी रुग्णवाहिका चालक संजय पुनसे यांचा बुधवारी कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. ही बाब शहरातील रुग्णवाहिका चालकांसाठी धक्कादायक ठरली. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत सायरन वाजवीत रांंगेत १७ ते २० रुग्णवाहिका नेऊन सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला व अनोखी श्रद्धांजली वाहिली. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका जात असल्याचे बघून अनेकांच्या काळजाचा

ठोका चुकला.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. संक्रमित रुग्ण आणि मृत्यूसंख्येचा आलेख वाढतच आहे. अशातच कोरोना रुग्णांची ने-आण करताना रुग्णवाहिकाचालक संजय पुनसे यांना अगोदर सारीने ग्रासले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. मात्र, १९ मे रोजी रात्री १ वाजता ते दगावले. त्यांचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. आपला सहकारी गेल्याचे अतिव दुख: अन्य खासगी रुग्णवाहिका चालकांना झाले. रुग्णवाहिका चालक संघटनेच्यावतीने पुनसे यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायरनचा जोरदार आवाज करीत रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भुतेश्वर चौक येथून हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. एकाचवेळी सुमारे १७ ते २० रूग्णवाहिका हिंदू स्मशानच्या दिशेने जात असल्याचे बघून बुधवारी कोरोना मृत्यूचा स्फोट तर झाला नाही, अशी भीती नागरिकांना झाली होती. मात्र, रूग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या सहकारी चालकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी सायरन वाजवीत रिकाम्या रुग्णवाहिका आणल्यात, अशी माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एकाचवेळी १७ ते २० मृतदेह रुग्णवाहिकांमध्ये नेण्यात येत नाही, हे चित्र बघून काही क्षण शहरातील नागरिकांसह भुतेश्वर चौक परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती, हे विशेष.

कोट

संजय पुनसे यांना सारी आजाराने ग्रासल्याने इर्विनध्ये ९ मे रोजी भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र. १९ मेच्या रात्री १ वाजता दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला.

- निरंजन खंडारे, सहसचिव रुग्णवाहिका संघटना

कोट

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सायरन वाजवीत हिंदू स्मशानभूमीपर्यंत नेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्याअनुषंगाने रुग्णवाहिका चालकांचे नाव निष्पन्न करून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- राहुल आठवले, पोलीस निरीक्षक, सिटी कोतवाली ठाणे

---------------------------