शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

आंबियाची संत्री मातीमोल

By admin | Published: December 06, 2015 12:10 AM

संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्यावरही संत्रा फळाला लागलेली गळती,...

संत्रा उत्पादक हवालदिल : १० हजार ४१९ हेक्टरवर संत्राबागासुनील देशपांडे अचलपूर संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्यावरही संत्रा फळाला लागलेली गळती, तामिळनाडूत झालेला मुसळधार पाऊस, दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब यासह आदी राज्यांत विक्रीला आलेला राजस्थानचा संत्रा, व्यापाऱ्यांनी पाडलेले संत्र्याचे भाव आदी कारणांनी संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात १० हजार ४१९ हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक घेतले जाते. लहान संत्राफळे तर अक्षरश: रस्त्यावर फेकण्यात आलीत. संत्रा उत्पादकांचे यावर्षी प्रचंड नुकसान झाल्याने येथे संत्रा प्रक्रिया उद्योगाची गरज निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात वरूड व मोर्शी तालुक्याची ओळख असली तरी त्या पाठोपाठ अचलपूर तालुक्यातही संत्र्याचे पीक घेतले जाते. ५४,११६ पैकी १०,४१९ हेक्टर क्षेत्र संत्रा पिकाखाली आहे. तालुक्यातील १६,७२० हेक्टरचे सिंचन होत असून ८११३ विहिरीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून संत्राबागांना वेगवेगळ्या संकटांनी ग्रासले आहेत. भरीसभर तामिळनाडूत पावसाने हाहाकार केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. संत्र्याची मागणी घटली. दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाबसह इतर राज्यात विदर्भातील संत्र्याला मागणी होती. यंदा राजस्थानचा संत्रा दाखल झाल्याने अचलपूर तालुक्यातील संत्र्याचे भाव घसरले. तालुक्यात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी संत्र्याला कवडीमोल भाव दिल्यामुळे संत्रा उत्पादक हतबल झाला. आज-उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांचा संत्रा गळू लागला. झाडावर होता त्यालाही आंबिया बहार येण्यासाठी उतरवावे लागले. पडलेला संत्रा विक्री होत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही, असे दिसत आहे.अचलपूर तालुक्याचे सिंचनक्षेत्र मोठे आहे. खारपाणपट्ट्यातही थोडीफार जमीन येते. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. पैकी ५४,११६ हेक्टर जमीन वाहितीखाली आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम, तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ४ हजार ९७६ एवढी असून खातेदार ९८,९१३ आहेत. सिंचनाच्या मुबलक सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात फळपिके घेतली जातात. पपई, केळी, पेरू, संत्रा, आंबा, आवळा, सीताफळ आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.यावर्षी अचलपूर तालुक्यावर निसर्गाची अवकृपा झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच वादळी पावसाचा फटका पिकांना बसला. त्यात प्रामुख्याने केळी सापडली होती. जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी त्यानंतर दडी मारली. अत्यल्प झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेऱ्यात घट झाली. खारपाणपट्ट्यातील काही जमिनीत पेरणी झाली नाही. या वर्षात तालुक्यात २०४३ हेक्टरवर ज्वारी, १६०१२ हेक्टरवर सोयाबीन, १७११० हेक्टरवर कपाशी, ६१२६ हेक्टरमध्ये तूर पिकाची पेरणी करण्यात आली होती. तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. यावर्षी संत्र्याचे भरघोस पीक येऊनही मागणी नाही. ओलीताच्या सुविधा असल्याने वेगवेगळी पिके घेऊन जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. पण अस्मानी संकटापुढे शेतकरी हवालदिल होत आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगाशिवाय पर्याय नाही, असे दिसते.