शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
2
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
3
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
4
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
5
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
6
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
7
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
8
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
9
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
10
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
11
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
12
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
13
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
14
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
15
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
16
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
17
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
18
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
19
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?

महाराष्ट्रातील निसर्ग पर्यंटन स्थळांना मुबलक निधी; मेळघाट अन् पेंच वगळले

By गणेश वासनिक | Published: October 18, 2024 5:30 PM

Amravati : ३२ स्थळांचा समावेश; चंद्रपूरला निधीसाठी झुकतं माप

अमरावतती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर राज्य शासनाने राज्यातील ३२ निसर्ग पर्यटन स्थळांना ७२४५ कोटींचा भरघोष निधी दिला आहे. यामध्ये ताडोबासह विदर्भातील नऊ वनपर्यंटन स्थळांचा समावेश आहे.

वनविभागाच्या क्षेत्रामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, तसेच वनक्षेत्रातील पुरातन स्थळांचा पर्यटन म्हणून उपयोग करण्यासाठी अलीकडे वन विभागात निसर्गपर्यटन अर्थात जंगल सफारी, ऐतिहासिक गडकिल्ले, उद्यान अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, ईको पाॅर्क ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. याकरिता राज्य शासन २४०६-२२९५ मध्ये लेखाशीर्षातून दरवर्षी निधी उपलब्ध करून देत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निसर्ग पर्यटन स्थळांकरिता शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नव्हता, हे विशेष. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर निसर्ग पर्यटन विकास स्थळांंना शासन पावल्याचे दिसून येते.

मेळघाट, बोर, पेंच, नवेगाव बांधला डच्चूराज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटन स्थळाकरिता भरपूर निधी दिला आणलेला असताना विदर्भातील सर्वांत मोठ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला निधी मिळालेला नाही. याशिवाय बोर, पेंच आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला निधी देण्यात आलेला नाही. राजकीय अनास्था व प्रशासकीय धोरण यासाठी कमी पडल्याचे स्पष्ट होते. यवतमाळ जिल्हातील टिपेश्वरला मात्र २०४.६० कोटी एवढा निधी मिळाला आहे. टिपेश्वर अभयारण्यास भरीव निधी मिळणार म्हणून विभागीय वनाधिकारी यांनी बदली झाल्यानंतर न्यायालयाचा स्थगनादेश आणून खुर्ची ‘सहीसलामत’ ठेवली ती याच साठी का? असा सवाल उपस्थित हाेत आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प