अमरावती : जिल्ह्यात १८ ते २४ एप्रिल दरम्यान एका दिवसाला सरासरी ५५४ रुग्णांची नोंद झाली. या तुलनेत ४०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. या कालावधीत रोज सरासरी १२ मृत्यूची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या चिंता वाढली आहे. मागच्या आठवड्यापर्यंत १० टक्क्यांवर असलेली पॉझिटिव्हिटी आता २५ वर पोहोचल्याने जिल्ह्याची स्थिती धोक्याच्या वळणावर असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जिल्ह्यात रोज लागणाऱ्या १५ ते १८ मे.टन ऑक्सिजनच्या तुलनेत एक दिवसाचा शिल्लक असलेला साठा, कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन निरंक असल्याने बंद असणारे १०० वर लसीकरण केंद्र व संपलेले रेमडेसिवीर यामुळे रुग्णांना मरणाचे दारात सोडणार काय, असा रुग्णांच्या नातेवाईकांचा अस्वस्थ करणारा सवाल आहे.
सात दिवसांतील एकूण बरे झालेले रुग्ण : ४०३
सात दिवसांतील एकूण मृत्यू झालेले रुग्ण : ८४
सात दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी : ५५४
सात दिवसांत मृत्यू झालेले एका दिवसाला सरासरी रुग्ण :१२