शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Amravati: बीटी बियाणांचा काळाबाजार, कारवाई केव्हा?, कृषी सहायकांच्या उपस्थितीत मिळतात दोन पाकिटे

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 24, 2024 9:57 PM

Amravati News: हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे.

- गजानन मोहोड अमरावती - हंगामापूर्वीच बीटी कपाशीच्या मागणी असलेल्या काही वाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या निगराणीत एका शेतकऱ्याला बियाणाचे दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही दुकानदार वाढीव दराने विक्री करीत असल्याचेही समोर आले आहे. शेतकऱ्यांची तक्रार नसल्याने कृषी विभागाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे.

यंदाचा खरीप हंगाम काही दिवसांवर आलेला असल्याने शेतकऱ्यांद्वारा बियाणे, खतांची खरेदी सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांची अधिक मागणी असलेल्या काही बीटी बियाणांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे. सदर कंपनीकडे अडीच लाखांवर पाकिटांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जिल्ह्यासाठी फक्त ६५ हजार पाकिटांचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे व त्यातील काही पुरवठादेखील शहरासह काही तालुक्यांना करण्यात आलेला आहे.मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी व उशिरा झाल्याने व काही दुकानातच पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांच्या अन् कृषी विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अधिकतम शेतकऱ्यांना बियाणे मिळावे, यासाठी एका शेतकऱ्याला दोन बियाणे पाकिटांची विक्री करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर यांनी सांगितले. प्रत्येक केंद्रात कृषी सहायकांची नियुक्तबीटीच्या विशिष्ट वाणांचा तुटवडा असल्याने ज्या ठिकाणी कृषी केंद्रात बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशा केंद्रांमध्ये कृषी सहायकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यांच्या उपस्थितीत एक शेतकऱ्याला दोन पाकिटांची विक्री करणे सुरू करण्यात आले आहे. अशा दुकानातील अपडेट स्टॉक बोर्डावर नमूद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ग्रामीणमध्ये बियाणांचे दर दामदुप्पटकेंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार बीटी बियाणांच्या पाकिटाची एमआरपी ८६७ रुपये आहे. ग्रामीणमध्ये ९०० ते १२०० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनाच बियाणांची आवश्यकता असल्याने त्यांच्याद्वारा तक्रार झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे भरारी पथकाद्वारा अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. मागणीच्या तुलनेत कमी आवंटन प्राप्त आहे. त्या विशिष्ट वाणाचे बियाणांचा पुरवठा उशिराने झाला व कमी झाला. बियाणे उपलब्ध असलेल्या दुकानात कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या देखरेखीमध्ये विक्री सुरू आहे.- राहुल सातपुतेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व तालुक्यातील भरारी पथकांचा बियाणे विक्रीवर वॉच आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. शिवाय प्रत्येक दुकानात कृषी सहायक आहेत. बियाणे विक्रीसोबतच लिंकिंग होऊ नये, यावर त्यांचा वॉच आहे.- अजय तळेगावकर, कृषी विकास अधिकारी (जि.प.)

टॅग्स :AmravatiअमरावतीAgriculture Sectorशेती क्षेत्र