- गणेश वासनिकअमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट्स (बीडीयूएस) स्थापन केले आहेत. या युनीटद्वारे चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई केली असून १ लाख वाहनांसह १०२० मोटारगाड्यांचे लोडिंगची नोंद करण्यात आली आहे.
बीडीयूएस युनीट हे स्थानिक उद्योगांसह नवीन ऑफर आणि लवचिक योजनांची झपाट्याने विक्री करतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करतात. परिणामी, ऑटोमोबाईल उद्योग अत्यंत सोयीस्कर आणि रेल्वेने वाहतुकीसाठी श्रेयस्कर असल्याचे सिद्ध होत आहे. चालू आर्थिक वर्षातील ऑटोमोबाईल्सच्या लोडिंगच्या आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते.
१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १०२० ऑटोमोबाईलचे रेक लोडिंग आणि १५९.१४ कोटी रुपयांची कमाई नोंदवण्यात आली आहे. २०२२-२०२३ या वर्षात मध्य रेल्वेकडून एकूण १.०२ गाड्यांची वाहतूक करण्यात आली आहे. मुंबई विभागातील कळंबोली, नागपूर विभागातील अजनी, भुसावळ विभागातील नाशिकरोड, सोलापूर विभागातील दौंड व विलाड आणि पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहतुकीसाठी वाहनांचे लोडिंग करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने १ एप्रिल ते ३० जून २०२३ या कालावधीत ऑटोमोबाईल्सचे २६७ रेक लोड केले आहेत, जे ३३.५ टक्क्याची वाढ दर्शवून मागील वर्षी याच कालावधीत २०० रेक लोड करण्यात आले आहे. यातून रेल्वेला चांगली कमाई झाली आहे.- शिवराज मानापुरेजनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे मुंबई