शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

अमरावतीमध्य रेल्वेला भंगारातून मिळाले ४५.२९ कोटी

By गणेश वासनिक | Published: June 13, 2023 5:14 PM

एप्रिल व मे दोन महिन्यात भंगाराची विल्हेवाट, ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत ई-निविदाद्वारे प्रक्रिया

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत ई निविदाद्वारे प्रक्रिया राबविली. यात एप्रिल व मे २०२३ या दोन महिन्यात भंगाराची विल्हेवाट लावताना मध्य रेल्वे प्रशासनाला ४५.२९ कोटींचा महसृल मिळाला आहे. रेल्वेचा प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री केल्यानंतरच भंगार विक्री झाल्याची माहिती आहे.

मे महिन्यात भंगार विक्रीतून २२.६९ कोटी तर त्यानुसार आतापर्यंतची एकत्रित विक्रीतून ४५.२९ कोटींचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम मे २०२३ पर्यंतच्या समानुपातिक उद्दिष्टापेक्षा १३.२३ टक्के जास्त आहे. वार्षिक उद्दिष्ट ३०० कोटी आहे. भंगारची विक्री मध्य रेल्वेच्या मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे.

विकल्या जाणाऱ्या भंगाराच्या प्रमुख वस्तूंमध्ये ईएमयू कोच, आयसीएफ कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर भंगाराचा समावेश हाेता. ‘झिरो स्क्रॅप मिशन’ चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात असल्याची माहिती भुसावळ येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती