- जितेंद्र दखनेअमरावती - जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वे क्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात जलस्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांनी दिली.
सद्यस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या मान्सृूनपूर्व स्त्रोतांची सासायनिक तपासणी याद्वारे होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहीमेत जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने जलसुरक्षा रक्षक,गावातील पाच महिलांचे मार्फत व आरोग्यसेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकायनि गोळा केले जात आहेत. संकलित पाणी नमुन्याची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या उपविभागीय प्रयोगशाळेतून केली जाणार आहे. गुणवत्ताधारितजोखीम निश्चितीजिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी प्रपत्र अ, ब, क तयार करून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले असून, त्याद्वारे स्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित केली जाणार आहे. त्याआधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे हा हेतू स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होते. त्यावर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, हाच प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. स्वच्छता सर्वेक्षणामुळे जलजन्य आजारामुळे होणाऱ्या साथीस प्रतिबंध घालता येतो.- संतोश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तालुकानिहाय पाणी पुरवठा स्त्रोतांची संख्याअचलपूर १००,अमरावती १०९,अंजनगाव सुजी १२,भातकुली ७०,चांदुर बाजार ८०,चांदुर रेल्वे १२०,चिखलदरा २५९,दर्यापूर १३,धामनगांव रेल्वे ११७,धारणी २४१, मोर्शी १०२,नांदगाव खंडेश्र्वर १८८,तिवसा ११०,वरूड १३१,