शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Amravati: ‘खाकी’मुळे डेअरिंग; आता पोलीस वाहनांचे १३ जणींच्या हाती स्टिअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 5:10 AM

Amravati News: पोलिस दलातील वाहनांचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती आले आहे. अमरावती जिल्ह्यात १३ महिला आता वाहनचालक म्हणून जिल्हा पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत.

- मनीष तसरेअमरावती - पोलिस दलातील वाहनांचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती आले आहे. अमरावती जिल्ह्यात १३ महिला आता वाहनचालक म्हणून जिल्हा पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत. शहर पोलिस मुख्यालयात चार, तर ग्रामीण पोलिस दलात नऊ महिला कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग पूर्ण होऊन या महिला पोलिस दलाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. आतापर्यंत या विभागात पुरुष मंडळीच वाहन चालक म्हणून असायची. आता या महिला चालक झाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा आनंदी आहेत.

पहिल्यांदा स्टिअरिंग सांभाळताना थोडी चिंता वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का, असेही वाटले. मात्र, आता ट्रेनिंगनंतर भीती, चिंता दूर गेल्या आहेत. आता अवजड आणि लाइटवेट असलेले वाहन या महिला सहजरीत्या चालवित आहेत. प्रत्येकालाच खाकी परिधान करता येत नाही. आम्ही खाकी परिधान करतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे नव्याने रुजू झालेल्या महिला चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले. आता स्वतःचा अभिमान वाटतो, असेही वाहनचालक महिला पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिस दलातील पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील कर्तव्य बाजावावे लागते, असे असले तरी या आधी जिल्हा पोलिस दलात एकही महिला पोलिस वाहनाची चालक म्हणून कार्यरत नव्हती. दरम्यान, पोलिस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे १३ महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपायांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आहे आणि काही तरी वेगळे करायचे आहे, असं चॅलेंज त्यांनी स्वीकारले. यासाठी स्वखुशीने जिल्हा पोलिस मोटार परिवहन विभागात अर्ज सादर केला आणि या सर्व महिलांचे खंडाळा येथे चालक प्रशिक्षण केंद्र येथे साडेसात महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले. आता मात्र या सर्व महिला मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत.

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे अमरावती ग्रामीण व पोलिस आयुक्तालय शहर या सर्व महिला चालक म्हणून खंडाळा येथे साडेसात महिन्यांची कौशल्य चाचणी पार करून पोलिस दलाचा अभिमान वाढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस