अमरावती: सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन निकषांवर काढण्यात आलेल्या राज्यातील २७ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात अमरावती महापालिकेने नववा क्रमांक पटकावला आहे. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप आणि समाज माध्यमांतील खात्यांवरील माहितीवर हा निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. 'पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो. उपलब्धता, सेवा आणि समाज माध्यम वापर अशा स्वतंत्र निकषांवर अमरावती महापालिकेने चांगली कामगिरी आहे.
प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान व्हावे याकरिता अमरावती महानगरपालिका नेहमी अग्रेषित राहिली आहे. त्याच कल्पनेतून कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकरिता महापालिकेमार्फत मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली. तसेच महापालिकेच नवीन संकेतस्थळ तसेच माय अमरावती मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले. समाजमाध्यमांमार्फत महापालिकेच्या विविध योजनांची माहिती प्रकाशित करण्यात आली. ‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये सहज उपलब्धता, सेवा आणि पारदर्शकता या तीन प्रमुख निकषांनुसार सर्वेक्षण करण्यात आले.
असे पूर्ण केले निकषसहज उपलब्धता या निकषानुसार संकेतस्थळ तसेच माय अमरावती मोबाईल ॲपद्वारे सेवा आणि माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आली. तर, सेवा या निकषांतर्गत संकेतस्थळ व मोबाईल ॲपमार्फत विविध सेवा या आरटीएस पोर्टल मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या. तर प्रशासकीय व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी, याकरिता महापालिकेच्या विविध योजनांची माहिती समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली. आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सिस्टीम मॅनेजर, अमित डेंगरे व संगणक विभागाने त्यासाठी प्रयत्न केले. सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन निकषांवर काढण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात महापालिकेने नववा क्रमांक पटकावला. अमरावतीकरांना कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जलद सेवा प्रदान करण्यासाठी महानगरपालिका नेहमी कटिबद्ध राहिली आहे. - डॉ. प्रवीण आष्टीकर, महापालिका आयुक्त