लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी आमदार आहे. आम्ही महाआघाडीतच आहोत, राहू. महाआघाडीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला शिरोधार्य असेल.देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदारसंघ
भाजपने रात्रीच्या अंधारात ज्या काही घडामोडी केल्यात. त्या निषेधार्ह आहेत. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचेच सरकार स्थानापन्न होईल.बळवंत वानखडे, आमदार, दयार्पूर मतदारसंघरात्रीच्या अंधारात केलेला प्रकार घृणास्पद व धक्कादायक आहे. त्या घटनाबाह्य व असंवैधानिक कृत्याचा आम्ही निषेध करतो. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.यशोमती ठाकूर, आमदार, तिवसामागील पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात राज्याने प्रगती केली. यंदाच्या निवडणुकीत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला. पुढील पाच वर्षे राज्याची अधिक प्रगती होईल.प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वेआजची घडामोड प्रतिक्रियेबाहेरची आहे. मात्र, पाण्यात आग लागू शकते, राजकारणात काहीही होऊ शकते, त्याची प्रचिती पुन्हा आली. त्यात नवल वाटून घेण्याची गरज नाही. वैचारिक मतदानाचे पतन त्यासाठी कारणीभूत आहे.बच्चू कडू, आमदार, अचलपूरराज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार बनेल, असे मी पंधरवड्यापूर्वी बोललो होतो. ती भविष्यवाणी खरी ठरली. फडणवीस यांचे नेतृत्व सर्वव्यापी आहे. शिवसेनेच्या मुजोरीला जनतेने धडा शिकविला.रवि राणा, आमदार, बडनेरा
राज्यातील जनतेने बाजप, सेनेला जनादेश दिला होता. मा. शिवसेनेद्वारा याचा अपमान करण्यात आला. याविषयी अपमानास्पद शब्ध वापरल्याने लोकशाहीचा अपमान झाला. अजित पवारांनी साथ दिली त्यांचे स्वागत.दिनेश सूर्यवंशी,भाजप जिल्हाध्यक्ष
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससोबत आम्ही सरकार स्थापन करत असताना भाजपने टीका केली. आता अजित पवारांची संगत कोणत्या नैतिकतेत बसते, हे देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगावे.राजेश वानखडे,जिल्हाप्रमुख, शिवसेना
देवेंद्र फडणविसांनी चोरून सरकार बनविले. हे सरकार टिकणार नाही. अजित पवारांसोबतचे आमदार आता शरद पवार यांचेकडे परतलेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल.बबलू देशमुख,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस