विभागीय आयुक्तांचे प्रयत्न : यंदा ३९८ कोटी ९० लाखांची वसुलीअमरावती : विभागात चालू आर्थिक वर्षात शासनाने दिलेल्या ३८७ कोटी ९३ महसुली उद्दीष्टाच्या तुलनेत ३१ मार्च अखेरपर्यंत विभागाने ३९८ कोटी ९० लाख ४५ हजाराचे उद्दीष्ट ओलांडले आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या सुक्ष्म नियोजनामुळे यंदा १०२.८२ टक्के महसुली वसुली झाली आहे. विशेष म्हणजे विभागातील पाचही जिल्ह्यांची वसुली १०० टक्क्यावर झाली आहे.विभागात वर्षभऱ्यात जमीन महसूल कर, करमणूक कर व गौण खनिजांची वसुली करण्यात आली. गौण खनिजांच्या वसुलीसाठी विभागीय आयुक्तांनी नियोजन केल्यामुळे अधिकाधिक दंड वसूल करण्यात आला. यंदा अमरावती विभागाला १२,२४० लाखाचे उद्दिष्ट असताना लाखाची वसुली झाली. ही १०४.७७ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात ६९५५ लाखांचे लक्ष्य असताना ७०२०.१४ लाखांची वसुली झाली आहे. ही १००.९४ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८४५० लाखांचे महसुली उद्दिष्ट असताना ८४६९.७८ लाखांची वसुली झाली. ही १००.२३ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६२५५ लाखांचे उद्दिष्ट असताना ६२७२.२१ लाखांची वसुली झाली आहे. ही १००.२८ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६२५५ लाखांचे उद्दिष्ट असताना ६२७२.२१ महसुली वसुली झाली आहे. ही १००.२८ टक्केवारी आहे. वाशिम जिल्ह्यात ४८९३ महसुली वसुलीचे लक्ष्य असताना ५३०४.३५ लाखांची वसुली झाली आहे. ही १०८.४१ टक्के वसुली आहे. शासनाने दिलेली जबाबदारी सर्व जिल्ह्यांनी खुप चांगल्या पद्धतीने पार पाडल्याने विभागाने वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. - ज्ञानेश्वर राजुरकर, विभागीय आयुक्त
अमरावती विभागाने केले महसुली उद्दिष्ट पार
By admin | Published: April 02, 2016 12:04 AM