अमरावती : शासनाने थकबाकीदार शेतक-यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. यासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतक-यांपैकी सहा लाख ६५ हजार ४६६ शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, १५ तारखेच्या आत पात्र शेतकºयांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.शासनाद्वारे जाहीर कर्जमाफी योजनेसाठी अमरावती विभागातील सात लाख ९७ हजार ५६३ थकबाकीदार व चालू दोन लाख असे एकूण १० लाख शेतकरी पात्र आहेत. शासनाद्वारे जाहीर अटी व शर्तींनुसार किमान दोन लाख शेतकºयांना योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून सेतू, महाआॅनलाईन, सीएससी व संग्राम केंद्रांवर आॅनलाईन अर्ज मोफत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या सुरूवातीपासूनच सुमारे महिनाभर सर्व्हर डाऊनची समस्या, आधार सुविधा नसलेल्या शेतकºयांसाठी असणारे बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होने, नेट कनेक्टीव्हीटी नसणे, केंद्रचालकांचे शेतकºयांना असहकार्य आदी कारणांमुळे आॅनलाईन अर्ज प्रक्रियेचा बोजवारा उडाला.परिणामी संबंधित जिल्हाधिकाºयांसह विभागीय आयुक्तांनी केंद्रांना भेटी देवून ‘आपले सरकार’ पोर्टल संदर्भात सीएमओ कार्यालयाशी थेट संपर्क साधल्याने दोन दिवसांपासून सर्व्हरचा वेग वाढला आहे. सुटीच्या दिवशी देखील केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रचालकांना दिल्यामुळे सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५ अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.
अमरावती विभाग : कर्जमाफीसाठी सात लाख शेतक-यांचे आॅनलाईन अर्ज, १० लाख शेतकरी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 2:31 AM