शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

अमरावती : डॉ. विजयकुमार चौबे यांनी फसवणूक करून कुलगुरूपद भूषविले? फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार

By गणेश वासनिक | Published: March 26, 2023 2:50 PM

युवक कॉंग्रेस आक्रमक, भादंवि संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत कुुलगुरूपदाचा बेकायदेशीरपणे कारभार सांभाळला. कुलगुरू पदांबाबत राज्यपाल भवनातून कोणतेही आदेश नव्हते, तरीही डॉ. चौबे यांनी शैक्षणिक, प्रशासकीय फाईलींवर स्वाक्षरी केल्या आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून त्यांच्यावर भादंवि संहितेनुसार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी युवक कॉंग्रेसने २४ मार्च रोजी फ्रेजरपुरा पोलिसात केली आहे. 

युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे आजारी असल्याने प्रभारी कुलगुरू पदाचा कारभार डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडे देण्यात आला होता. खरे तर प्रभारी कुलगुरू पदासाठी शैक्षणिक पात्रता नसताना डॉ. चौबे यांच्याकडे प्रभारी कुलगुरू पदाचा कारभार कसा सोपविला, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, विद्यापीठ नियमावलीनुसार कुलगुरू पदावर असेपर्यंत प्र-कुलगुरू हे पद कायम असते. त्यानुसार तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यामुळे कुलगुरूंचे पद रिक्त होताच प्र-कुलगुरूंचे पद नियमानुसार खारीज होते. तथापि, डॉ. विजयकुमार चौबे यांनी राज्यपाल भवनातून प्रभारी कुलगुरूपद स्वीकारण्याचे नव्याने कोणतेही आदेश नसताना स्वयंघोषित कुलगुरू म्हणून २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत प्रभारी कुलगुरू पदांचा नियमबाह्य कारभार हाताळला. ही बाब अतिशय गंभीर असून, शासनाच्या सेवा शर्तीचा भंग करणारी आहे. प्रभारी कुलगुरु पदांचा कारभार हाताळताना फाईलींवर नियमबाह्य स्वाक्षरी केल्याप्रकरणी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत डॉ. चौबे यांच्या कारभाराची चौकशी करून भादंविच्या संहितेनुसार कार्यवाही करावी, अशा आशयाची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच राज्यपालांकडे तक्रारही पाठविण्यात आली आहे. 

सिनेटमध्ये गाजला डॉ. चौबे यांचा मुद्दा राज्यपाल भवनातून प्रभारी कुलगुरू पदांचा कारभार हाताळण्यासाठी नव्याने आदेश नसताना डॉ. विजयकुमार चौबे यांनीकशाच्या आधारे हे नियमबाह्य पद सांभाळले. मौखिक आदेशावर कुलगुरूपदांचे कामकाज चालते का? असा सवाल नुटाचे डॉ. डॉ. प्रवीण रघुवंशी, प्राचार्य फोरमचे डॉ. आर.डी. सिकची यांनी १५ मार्च रोजी सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी ‘चुप्पी’ साधली होती. डॉ. चौबे यांच्या प्रभारी कुलगुरूंचा कारभारविषयी ते अधिसभेत कुलगुरु, कुलसचिव हे काहीच उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे याप्रकरणी ‘डाल मे कुछ काला है’ अशा प्रतिक्रिया सिनेट सदस्यांचा उमटल्या होत्या, हे विशेष. माजी प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी सोमवारनंतर चौकशी आरंभली जाईल. विद्यापीठ कायदा, नियमावली तपासली जाईल. कशाच्या आधारे प्रभारी कुलगुरूपदाचा कारभार हाताळला, याबाबत कागदपत्रे तपासली जातील.गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

टॅग्स :Amravatiअमरावती