धामणगाव रेल्वे (अमरावती) : शहरातील क्रिकेट सट्ट्यातील आणखी एका आरोपीला अटक केल्याने याप्रकरणी आरोपींची संख्या पाच झाली आहे. दुसरीकडे दत्तापूर पोलिसांनी तपासाची चक्र यवतमाळ, वर्धा जिल्ह्याच्या दिशेने फिरविले आहे. दिवाणी फौजदारी न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायाधीश जुही हुशंगाबादे यांनी पाचही आरोपींना जामीन मंजूर केला.गौरव ओमप्रकाश पांडे (२८) असे पाचव्या आरोपीचे नाव आहे. भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाºया शुभम जयस्वाल, अखिलेश गावंडे, प्रणय कांकरिया व अंकुश बुधलानी यांना अटक केल्यावर त्याच्याजवळून १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामागील मास्टर माईंड कोण, याचा तपास पोलीस करीत आहेत. कोठडीदरम्यान आरोपींनी माहिती दिल्याचे पीआय अशोक लाडे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात स्था.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, पीआय अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सदानंद मानकर पी.एस.आय. अरविंद कुमरे, संजय प्रधान, मंगेश लकडे, विजयसिंग बघेल किरण दारव्हेकर, गणेश गायकवाड आदींनी कारवाई केली.
तीन जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या धामणगावात क्रिकेट सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पी. एस. आय सचिन कानडे यांच्या नेतृत्वात एक पथक यवतमाळकडे रवाना झाले.