रोगराई वाढणार : ‘ई-कोलाय’चा प्रादुर्भाव ठरू शकतो धोकादायक वैभव बाबरेकर अमरावतीपावसाळ्यात दूषित पाणी आणि दूषित अन्नाच्या सेवनामुळे रोगराई वाढण्याची भीती असते. त्यातच शहरात उघड्यावर विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमुळे अमरावतीकरांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी उघड्यावर सर्रास अन्नपदार्थांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यान्नांचा वापर टाळून आरोग्य जपण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला देण्यात आला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. सततच्या पावसामुळे घरातही कोंदट वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. पाण्यामुळे किडे व जंतू अधिक सक्रिय होत असल्यामुळे लगेच आजार बळावण्याची शक्यता असते. ताप सर्वसाधारण बाराही महिने पाहायला मिळते. मात्र, या दिवसांत तापासह खोकला, सर्दी, टायफाईड, गोवर, डायरिया, उलट्या, कावीळ अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. शहरात उघड्या अन्नपदार्थावर माशा व कीटक बसतात. त्यातच गलिच्छ ठिकाणीच अन्न पदार्थांची विक्री होत असल्यामुळे जंतू अधिक सक्रिय होतात.पावसाळ्यात उघड्यावरील अन्न पदार्थावर माशी व कीटक बसतात. त्यांच्यामुळे विविध प्रकारचे जंतू शरीरात जाऊन आजार बळावतात. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी.
उघड्यावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर!
By admin | Published: June 20, 2015 12:33 AM